Gautami Patil_Accident Case 
पुणे

Pune Accident: अपघात प्रकरणावर अखेर गौतमी पाटीलनं सोडलं मौन! चंद्रकात पाटलांच्या विधानावरही दिली प्रतिक्रिया; म्हणाली, वाईट...

Pune Accident: पुण्यात कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव पुलाजवळ आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारनं झालेल्या अपघातप्रकरणावर गौतमीनं अखेर मौन तोडलं.

Amit Ujagare

Pune Accident Gautami Patil Vehicle: पुण्यात कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव पुलाजवळ आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारनं झालेल्या अपघातप्रकरणावर गौतमीनं अखेर मौन तोडलं. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना या घटनेबाबत काय काय घडलं हे सांगितलं. आपला या घटनेशी काय संबंध होता? याचा आपल्याला किती त्रास झाला? हे सांगताना मंत्री चंद्रकात पाटील यांच्या विधानावरही तिनं भाष्य केलं आहे.

गौतमी पाटील म्हणाली, "ज्या दिवशी या सर्व गोष्टी झाल्या तेव्हा मी तिथं नव्हतेच. गाडी ड्रायव्हरकडं होती तसंच जेव्हा ही घटना घडली आणि मला याबाबत कळलं तेव्हा माझे मानलेले भाऊ आहेत त्यांना मी घटनास्थळी पाठवलं. अपघातग्रस्त व्यक्तीसाठी मी मदतीचा हात पण पुढे केला. कारण मी पण आज गरिबीतूनच इथपर्यंत आले आहे. जेवढी माझ्याकडून मदत होईल तेवढी मी त्यांना मदत पाठवली. ज्या दिवशी पहाटे हा अपघात झाला त्याच दिवशी दुपारी माझं अपघातग्रस्त रिक्षा चालकाच्या कुटुंबियांशी बोलणं झालं.

पण त्यांनी मी देऊ केलेली मदत नाकारली आणि आम्ही याबाबत कायदेशीर कारवाई करु, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर मी त्यांना ठीक म्हटलं, तुम्ही म्हणाल तसं करु इतकंच सांगितलं. पण या सर्व प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना लोकांनी मला ट्रोल केलं, कोणी काहीही बोलतं आहे, याला काहीही अर्थ नाही. आज माझं नाव पूर्णपणे बदनाम केलं जात आहे. पण जे काही आहे ते कायदेशीर चाललं आहे तर मग चालू द्यात ते कायदेशीर, असं मला म्हणायचं आहे"

या प्रकरणी पोलिसांनी जी काही चौकशी केली त्यासाठी मी त्यांना पूर्णपणे मदत केली आहे. यासाठी त्यांनी जी काही गाडीची कागदपत्रे मागितली ती देखील मी दिली. अपघातावेळी मी कुठे होते तसंच ड्रायव्हर संदर्भातील सर्व माहिती देखील मी पोलिसांना दिली. पण याच गोष्टी जाहिररीत्या मी सर्वांना सांगाव्यात असं मला वाटत नाही. पण जे कायदेशीर आहे ते मी माझ्या पद्धतीने करत आहे, जे सध्या सुरु आहे.

आता अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाची अपेक्षा असेल की मी प्रत्यक्ष त्यांची भेट घ्यायची होती तर त्यांची ती अपेक्षा रास्त आहे. पण माझ्या कार्यक्रमाच्या तारखा आधीच निश्चित झाल्यानं मी त्यामध्ये व्यस्त होते. त्यांना भेटण्यासाठी मला कार्यक्रम रद्द करता आले नाहीत. पण मी भावाच्या मार्फत त्यांना मदतीचा हात दिला तर त्यांनी ती मदत नाकारुन आम्ही कायदेशीर मार्गानं जाऊ असा रिप्लाय त्यांनी दिल्यानं मग मी त्यांना भेटून पण उपयोगच नाही ना. म्हणून मग मी पुन्हा गप्प राहिले. पण आज चार-पाच दिवस झाले असतील लोक मला ट्रोल करतच आहेत. मला ट्रोलिंग नवं नाही. कारण जेव्हापासून माझ्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल झालेत तेव्हा पासून मला लोक ट्रोलच करत आहेत, कोणीही मला चांगलं म्हणत नाही. मी काही चांगलं केलं तरी लोक मला वाईटच म्हणतात आणि वाईट केलं तर मग काय विचारुच नका. त्यामुळं जर या प्रकरणात माझा संबंधिच येत नाही तर तुम्ही माझ्या नावानं खडे का फोडत आहात. अनेकदा असे अपघात होतात पण त्यावेळी तुम्ही त्या लोकांना ट्रोल करता का? असा सवालही गौतमीनं केला आहे.

दरम्यान, याप्रकरणावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौतमीला कधी उचलायचं? अशा शब्दांत पोलिसांना विचारणा केली होती. यावर प्रतिक्रिया देताना गौतमी म्हणाली की, "अशा विधानाचं तर प्रत्येकाला वाईट वाटणारच. पण मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की, मला चंद्रकांत दादांनाही काही बोलायचं नाही. ठीक आहे जो तो त्याच्या परीनं बोलतो. मला फक्त एकच म्हणायचं आहे की, गाडी माझी आहे पण मी गाडीतच नव्हते, तरीही लोक बोलत आहेत. एखाद्या व्यक्तीला किती प्रमाणात तुम्ही टार्गेट करणार आहात? माध्यमांनी केलेल्या बातमीनंतर चार दिवसांत मी खूप रडले मला याचा खूपच त्रास झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT