Bapu Pathare Sarkarnama
पुणे

Bapu Pathare: राज्याचे नुकसान करणाऱ्या त्रिकुटाला शिक्षा करा ! जयंत पाटील गरजले 

Bapu Pathare: विकास फक्त कागदावर आहे, पण त्याचा लाभ सामान्य लोकांना मिळालेला नाही

सरकारनामा ब्यूरो

Bapu Pathare : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता परांडे नगर, धानोरी येथे बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी भव्य जनकल्याण जाहीर सभा घेतली.

या सभेत जयंत पाटील यांनी त्रिकुट सरकारने राज्याचे अतोनात नुकसान केल्याने त्यांना शिक्षा करा, गद्दारांना शिक्षा करा, शिवाजी महाराजांचा पुतळा गलथान कारभाराने पाडणाऱ्यांना शिक्षा करा,विचारांची लढाई जिंका,असे तळमळीचे आवाहन केले.

फडणवीस, शिंदे, अजित पवार हे भित्रे त्रिकुट असून भोपळा देणाऱ्यांना, श्रीमंतांची चाकरी करणाऱ्यांना महाराष्ट्राने अद्दल घडवली पाहिजे, असेही ते म्हणाले. पोर्शे अपघात प्रकरणातील बळींना श्रध्दांजली वाहण्यासाठी जयंत पाटील यांनी स्वतःचा सत्कार बाजूला ठेवला.

बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्व, जनसंपर्क, आणि लोकांसाठी केलेल्या कामाचे त्यांनी जोरदार कौतुक केले. पठारे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आणि वडगाव शेरीचे नाव बदनाम करणाऱ्या आमदाराला घरी बसविण्याचे आवाहन त्यांनी या सभेत मतदारांना केले. 

महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती. बापूसाहेब पठारे, जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के,जयदेव गायकवाड, रेखा टिंगरे, श्री. चंद्रकांत टिंगरे, स्वाती पोकळे, कैलास पठारे, जयवंत गोसावी, सुनील माने, सागर माळकर, सुनिल खांदवे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अंबुज पार्टी, रिपब्लिकन डेमोक्रॅटीक सह अनेक पक्ष, व्यक्तींनी पाठिंबा जाहीर केला.

आपल्या घणाघाती भाषणात जयंत पाटील म्हणाले, "विकास करणारा आमदार हवा कि विनाश करणारा आमदार हवा , हे तुम्ही राज्याला दाखवून दिले पाहिजे. बापूसाहेब पठारे हे एक कर्तबगार उमेदवार आहेत.

त्यांनी वडगावशेरीतील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या रुपाने वडगावशेरीत विकासाचे नवे पर्व सुरू होईल. असा दमदार उमेदवार विधानसभेत गेला पाहिजे."

त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, "राज्यातील सध्याचे सरकार चुकीच्या मार्गाने सत्तेवर आले असून चुकीच्या कामाने चालत राहिले. त्यामुळे राज्य २० वर्ष मागे पडले आहे. हे सरकार केवळ घोषणाबाजी करते; मात्र, प्रत्यक्षात जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे.

विकास फक्त कागदावर आहे, पण त्याचा लाभ सामान्य लोकांना मिळालेला नाही. समाजा-समाजात आणि धर्मा-धर्मात लढाया लावून भाजप सरकार स्वतःच्या भाकऱ्या भाजत असून त्यांचा सुपडा साफ केला पाहिजे."  

वडगाव शेरीला मॉडर्न विकासाचे मॉडेल करू :बापूसाहेब पाठारे यांचा निर्धार

सभेत बापूसाहेब पठारे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "आपण काय करतो आहोत याचे भान नसणारे उमेदवार या मतदारसंघात आहेत. त्यांनी हा मतदारसंघ राज्यात बदनाम केला.

मी निवडून आल्यावर वडगावशेरीची मान खाली जाऊ देणार नाही आणि वडगाव शेरीला मॉडर्न विकासाचे मॉडेल करू.  पाण्यासाठी आंदोलन करून, लॉकअपमध्ये जाऊन, वास मारणारी भाकरी खाणारा, मी कार्यकर्ता आहे, कमी पडणार नाही.

वडगावशेरीच्या जनतेने मला नेहमीच विश्वास दिला आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माझा एकमेव उद्देश हा वडगावशेरीचा विकास साधणे आहे, आणि त्यासाठी मी सातत्याने कार्यरत राहीन.

परांडे नगर येथे झालेल्या या सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. लोकांनी पठारे यांना पाठिंबा दर्शवत घोषणाबाजी केली. या सभेमुळे वडगावशेरीतील निवडणूक प्रचाराला अंतिम टप्प्याची गती प्राप्त झाली.

वडगावशेरीत रंगतदार लढत होण्याची चिन्हे असून बापूसाहेब पठारे यांचा प्रचार जोरदार गतीने आघाडीवर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT