Lawyers Election  Sarkarnama
पुणे

Lawyers Election : पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत रंगत; रंगणार 'चौरंगी' सामना

Lawyers Election : ...तर उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी सहा जण रिंगणात

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक 'चौरंगी' होणार आहे. या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून ३१ जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान व मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

वकिलांची शिखर संघटना असलेल्या 'पुणे बार असोसिएशन'च्या (पीबीए) वार्षिक निवडणुकीचे अंतिम चित्र शनिवारी स्पष्ट झाले आहे. यंदा पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार आहे. ज्येष्ठ वकील राहुल दिंडोकर, ॲड. जयश्री होले, ॲड. राणी कांबळे आणि ॲड. केतन कोठावळे हे अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.

नवीन कार्यकारणीच्या निवडणुकीसाठी शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात ३१ जानेवारीला मतदान होणार आहे. हे मतदान (voting) पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी करून पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

तसेच पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी सहा जण रिंगणात आहेत. यामध्ये ॲड. गीतांजली बालवडकर, ॲड. जयश्री चौधरी-बिडकर, ॲड. अमेय देशपांडे, ॲड. संजय पाटणकर, ॲड. विश्‍वजित पाटील आणि ॲड. पुनम स्वामी-प्रधान हे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.

तर सचिव पदांच्या दोन जागांसाठीची लढत ॲड. राहुल कदम, ॲड. गंधर्व कवडे, ॲड. मकरंद मते या तीन उमेदवारांमध्ये होणार आहे. तर खजिनदार पदासाठी ॲड. समीर बेलदरे आणि ॲड. प्रदीप चांदेरे यांच्यात लढत होत आहे.

त्याचबरोबर लेखापरीक्षकपदी ॲड. अजय देवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. अमित गिरमे आहेत. ॲड. दिलीप जगताप, ॲड. माधवी पोतदार, ॲड. शरद कुलकर्णी, ॲड. कांताराम नप्ते आणि ॲड. सिद्धेश्वर चौधरी उप निवडणूक अधिकारी आहेत.

दरम्यान, दहा जणांची कार्यकारिणी सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामध्ये ॲड. अमोल वडगणे, ॲड. प्रमोद नढे, ॲड. मयूरी कासट, ॲड. संजय खैरे, ॲड. रेश्‍मा चौधरी, ॲड. श्रध्दा जगताप, ॲड. राहुल प्रभुणे, ॲड. ऋषिकेश कोळपकर, ॲड. चंद्रसेन कुमकर आणि ॲड. सचिन माने या दहा जणांची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT