Pune News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दिवाळीच्या निमित्ताने बहुतेक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेत मिसळून 'राजकीय वारे' कोणत्या दिशेला वाहताहेत, याचा कानोसा घेत जनतेचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. पुण्यात भाजपचा असाच एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचेही कार्यक्रम झाल्याने पुण्यात खमंग चर्चा रंगल्या आहेत.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. यादरम्यान महापालिका निवडणुकांचीही शक्यता वर्तवली जात आहे, तर राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली पडलेली फूट, महायुतीचे सरकार, मराठा-ओबीसी आरक्षण वाद या गोष्टींनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळी संपल्यानंतरही राजकीय पक्षांकडून राजकीय फराळाचे कार्यक्रम सुरूच आहेत. पुण्यात रविवारी एकाच दिवशी चार ते पाच ठिकाणी विविध राजकीय पक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आल्याने जोरदार चर्चा सुरू आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'भाजपची मिसळ पार्टी'
पुण्यात भाजपने कसबा विधानसभा मतदारसंघासाठी स्नेहमेळावा आयोजित केला होता. भाजपचे नेते हेमंत रासने यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, पोलिस अधिकारी, महापालिका अधिकारी, सर्व पक्षांचे शहराध्यक्ष, गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष आणि मतदारसंघातील सात हजार नागरिकांनी या कार्यक्रमात हजेरी लावली. जवळपास सात हजार नागरिकांनी 'मिसळ पार्टी'चा आस्वाद घेतला.
पवार गट आणि ठाकरे गटाचा कार्यक्रम
भाजपच्या मिसळ पार्टीची चर्चा असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नीलेश निकम यांनीही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 'दिवाळी फराळ' कार्यक्रम घेतला. तेथेही सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सर्वधर्मीय नागरिकांनी आवर्जून हजेरी लावली, तर शिवसेना ठाकरे गटाच्या विशाल धनवडे यांनीही रास्ता पेठेत कार्यकर्ते, नागरिकांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते.
दिवाळी फराळाचे निमित्त साधून नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती केल्याची चर्चा आहे, पण एकाच दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्याने कार्यकर्त्यांची मात्र तारांबळ उडाली. प्रमुख नेत्यांनीही कार्यक्रमाला बहुतेक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावत 'राजकीय वारे' कोणत्या दिशेला वाहत आहेत, याचा कानोसा घेतल्याचे चित्र रविवारी होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.