Ravindra Dhangekar : धंगेकर हतबल; आता थेट आंदोलनाचाच निर्णय! काय आहे कारण ?

Sasoon Hospital Drug Case : पोलिस यंत्रणा, शासनाने केला विश्वासघात
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

चैतन्य मचाले

Pune Political News : ड्रग्जमुळे तरुणांचे आयुष्य बरबाद होत असल्याने ड्रग्जमाफियांना तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीरपणे घेतात, तर दुसरीकडे सर्व पुरावे हातात आहेत, तर राज्य सरकारची चौकशी पूर्ण झाली असतानाही ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही, असा आरोप करत आमदार रवींद्र धंगेकरांनी आता थेट आंदोलनाचाच इशारा दिला आहे.

ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणामुळे सांस्कृतिक राजधानी असा गौरव असलेल्या पुणे शहराची सर्वत्र बदनामी होत आहे. ही बाब पुणेकरांसाठी भूषणावह नाही. अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्यास पुण्याचा 'उडता पंजाब' अशी ओळख पुणे शहराची होण्यास वेळ लागणार नाही. समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्याने रवींद्र धंगेकर हतबल झाल्याचे दिसून येतात. यातूनच त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ravindra Dhangekar
Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : विदूषक कोण, हेच आता दिसून आले..! भुजबळांचा जरांगेंवर पलटवार

ड्रग्ज प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी, कारागृह प्रशासन गुंतले असल्याचे आपण सुरुवातीपासून सांगत होतो. या प्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीनेदेखील आपल्या अहवालातून हेच गुंतले असल्याचे सांगितले आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करून कारवाई करण्याचा फार्स करण्यात आला आहे. डाॅ. ठाकूर यांना अटक करून त्यांच्यावर अद्याप योग्य ती कारवाई झालेली नसल्याकडेही धंगेकरांनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार धंगेकर म्हणाले, या प्रकरणात अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये सहभागी ससून आणि कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांना हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखविलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली तरच यामध्ये दोषी असलेले खरे चेहरे समोर येतील. हे चेहरे समोर आल्यास अनेकांची अडचण होणार आहे. यातून या प्रकरणावर पडदा टाकण्याची भूमिका पोलिसांकडून घेतली जात आहे, असा गंभीर आरोपही धंगेकरांनी केला.

या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी आम्ही अनेकदा पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना अनेकदा भेटलो. ते हसतमुख आहेत, पण या प्रकरणी त्यांनी आता गंभीर होण्याची गरज असल्याचे धंगेकर यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ravindra Dhangekar
Jayakwadi Water Issue : 'समन्यायी'चा चुकीचा अर्थ काढून जायकवाडीला सोडलेले पाणी थांबवा - संगमनेर काँग्रेसची मागणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com