Ganesh Bidkar Sarkarnama
पुणे

BJP Leader Threat : भाजपच्या पुण्यातील नेत्याला धमकी; व्हिडिओ व्हायरल करत राजकीय करिअर संपवण्याचा दिला इशारा

Lok Sabha Election 2024 : समोरील व्यक्तीने धमकावत त्यांच्याकडे 25 लाखांची खंडणी मागितली आणि खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, व्हिडिओ व्हायरल करेन असा दम भरला. त्यानंतर बिडकर यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवली.

Sudesh Mitkar

Pune, 06 May : पुणे लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार ऐन बहरात आला असतानाच भाजपच्या नेत्याला आलेल्या धमकीच्या फोनने वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपचे पुण्यातील नेते गणेश बिडकर यांना फोनद्वारे धमकी देत खंडणी मागण्यात आली आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून त्यानंतर गणेश बिडकर यांनी थेट पोलिस चौकी गाठत तक्रार नोंदवली आहे. लष्कर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यामध्ये (Pune) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये जोरदार लढाई सुरू आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात गणेश बिडकर (Ganesh Bidkar) हे अग्रभागी आहेत.

मोहोळ यांच्या विजयासाठी गणेश बिडकर यांच्याकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे. अशातच त्यांना आलेला धमकीच्या फोननी चर्चांना उधाण आलेला आहे. आलेला फोन हा खंडणीसाठी होता का, यामागे कोणतं राजकीय षडयंत्र आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 5 मे) सायंकाळी गणेश बिडकर हे लष्कर परिसरातील बागबान हॉटेलजवळ होते त्यावेळी त्यांच्या फोनवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला.

समोरील व्यक्तीने धमकावत त्यांच्याकडे 25 लाखांची खंडणी मागितली आणि खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, व्हिडिओ व्हायरल करेन असा दम भरला. त्यानंतर बिडकर यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून खंडणीविरोधी पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

गणेश बिडकर यांना अशाप्रकारे यापूर्वी देखील खंडणीचे फोन आल्याचं समोर आला आहे. यापूर्वी म्हणजेच मार्च 2023 मध्येही गणेश बिडकर यांना खंडणीसाठी फोन आले होते. त्यावेळी त्यांना ‘व्हॉट्स अप’ कॉल करून 25 लाखांची खंडणी मागितली होती. तसेच, शिवीगाळ करत खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकू, बदनामी करू अशी धमकी देण्यात आली होती.

दरम्यान, एक वर्षानंतर पुन्हा तशाच प्रकारचा खंडणीसाठी फोन आणि तेवढ्याच रकमेची मागणी संबंधित व्यक्तीकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे यापूर्वी आलेली धमकी आणि ही धमकी देणारा व्यक्ती एकच आहे का?, याबाबत पोलिस कसून चौकशी करत आहेत.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT