Sandipan Bhumere News : उमेदवारी लेट पण प्रचार थेट! भुमरेंच्या प्रचारासाठी महायुतीचे नेते लागले कामाला

Chhatrapati Sambhajinagar Constituency : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होत आहे.
Sandipan Bhumere
Sandipan BhumereSarkarnama

Loksabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली होती. उमेदवारी लेट जाहीर झाली असली तरी भुमरे यांचा प्रचार मात्र थेट सुरू झाला आहे. पदयात्रा, काॅर्नर बैठका, सभा, गाठी-भेटी, गाव, वस्त्या, तांडे अशा सगळ्याच ठिकाणी पोहचण्यासाठी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते धावपळ करतांना दिसत आहेत.

भुमरे(Sandipan Bhumere) यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून राजस्थान प्रकोष्ठच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात राजस्थानी नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी राजस्थानी बांधवांनी ताकदीने महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प व्यक्त केला. या मेळाव्याला केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, हर्षवर्धन कराड, दीपक ढाकणे, राजस्थान प्रकोष्ठ अध्यक्ष संजय मंत्री आदींची उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sandipan Bhumere
Jalna Loksabha Constituency : '...तर जाहीर सभेत उठाबशा मारेन' ; दानवेंचे विरोधकांना चॅलेंज!

या शिवाय महिला बचत गट मेळावा, नव मतदार युवा संमेलनाच्या माध्यमातून संदीपान भुमरे मतदारांशी संपर्क साधत आहेत. येत्या काही दिवसांत भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्यासह बड्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजीनगरमध्ये महायुतीचे संदीपान भुमरे विरुद्ध महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एमायएमचे विद्यमान खासदार इम्तयिाज जलील यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र उमेदवार दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दरम्यान, महायुतीकडून भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, रिपाइं आठवले व इतर मित्र पक्ष सक्रीय झाले आहेत.

Sandipan Bhumere
Jalna Loksabha Constituency : 'मोदींच्या मंत्रिमंडळात दानवेंना कॅबिनेट मंत्री झालेलं पाहायचंय' ; खोतकरांनी व्यक्त केली इच्छा!

राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले संदीपान भुमरे संभाजीनगरमधून पहिल्यांदा लोकसभा लढवत आहेत. ते पैठण विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले आहेत. आता महायुतीने त्यांना संभाजीनगरात लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com