Pune BJP  Sarkarnama
पुणे

Pune BJP: मुलांच्या उमेदवारीसाठी आमदारांची प्रतिष्ठा पणाला! रविवारी जाहीर होणार भाजपची पहिली यादी

Pune BJP: पण यापूर्वी देखील २६ तारखेचा यादीचा मुहूर्त हुकल्याने आता आता दुसरा मुहूर्त तरी साधणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Amit Ujagare

Pune BJP: भाजपने उद्या (ता. २८) उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल असे जाहीर केले आहे. पण यापूर्वी देखील २६ तारखेचा यादीचा मुहूर्त हुकल्याने आता आता दुसरा मुहूर्त तरी साधणार का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपकडून उमेदवारांची यादी अंतिम करताना शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांकडून स्वतःच्या नावाची वर्णी लागावी यासाठी कोअर कमिटीवर दबाव आणला जात आहे.तर काही आमदारांनी त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यासाठी कायम बैठका सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीत सुमारे १०० नावांवर पूर्णपणे तोडगा काढला आहे. त्यात भाजपच्या जुन्या व महत्त्वाच्या उमेदवारांची नावे आहेत. तर काही तरुण कार्यकर्त्यांबद्दल प्रभागात चांगले वातावरण असल्याने अशा काही उमेदवारांची नावे निश्‍चित झाली आहेत. तसेच महिला उमेदवारांचाही यात समावेश असून, यात नव्या आणि जुन्यांचाही मेळ भाजपने घातला आहे. भाजपच्या दृष्टीने ए प्लस व बंडखोरी किंवा नाराजी उफाळून येणार नाही अशा प्रभागातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. ही यादी रविवारी दुपारनंतर जाहीर होणार आहे.

इच्छुकांचा पाठपुरावा

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार याची खात्री आहे अशांनी प्रभागात प्रचार सुरु केला आहे. पण ज्यांना उमेदवारी मिळणार की नाही याची धास्ती आहे, ज्यांच्या विरोधात राजकारण केले जात आहे असा संशय आहे किंवा आमदारांची नाराजी आहे अशा इच्छुकांकडून कोअर कमिटीतील सदस्यांना भेटून त्यांचे म्हणणे मांडत आहेत. काही जण मुंबईमध्ये फोन करून विविध स्तरातून स्वतःचे नाव पुढे रेटत आहेत. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष, निवडणूक प्रमुख, शहरातील मंत्री, प्रदेशावरील महत्त्वाचे पदाधिकारी यांना भेटण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. हे नेते घर, कार्यालय किंवा हॉटेलमध्ये बैठकीसाठी असतील तेथे बाहेर थांबून त्यांना गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. एकंदरीत कुंपणावर असलेल्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.

महिलेच्या उमेदवारीवरून वाद

प्रभागात माजी दोन पुरुष इच्छुक असताना तेथे महिलेसाठी जागा आरक्षीत झाली असल्यास दोघांपैकी एकाचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे एकाला घरातील महिलेला निवडणूक लढवावी लागणार आहे. भाजपने यावर तोडगा काढण्यासाठी दोघांपैकी एकाने घरातील महिलेला उमेदवारी देऊन तडजोड करावी असा प्रस्ताव ठेवला आहे. पण त्यावरून या इच्छुकांनी एकमेकांकडे बोट दाखवून स्वतःच निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. हे वाद अद्याप पक्षाला सोडविता आला नसल्याने ऐनवेळी एकाचा पत्ता कट होणार आहे. शिवाय तिसऱ्याच इच्छुकाच्या पत्नीला उमेदवारी मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक ७, ८, २६, २१, २३ यासह अन्य प्रभागात वाद सुरु आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT