Chhatron Ki Gunj: राहुल गांधी यांनी विद्यार्थी संवाद साधण्यासाठी देशभरात 'छात्रों की गुंज' नावाचं कॅम्पेन सुरु आहे. या कॅम्पेनचा पुण्यात उद्या कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये राहुल गांधी स्वतः पुण्यात येणार आहेत आणि विशेषतः मुलींसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पण या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला २१ ऑगस्टच्या रात्री ९ वाजल्याच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये जिथं हा कार्यक्रम पार पडणार आहे, तिथं अचानक गोंधळ सुरु झाला.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी सीओईपीमध्ये घुसून इथल्या विद्यार्थीनींना धमकावलं असून त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावू नये यासाठी त्यांना डांबून ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काल सीओईच्या कॉलेजमधील काही विद्यार्थीनींनी माध्यमांमध्ये बाईट दिला होता की, कॉलेजमधून आम्हाला तीन वर्षांपासून स्कॉलरशीप मिळालेली नाही.
हा मुद्दा आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत. यानंतर एबीव्हीपीच्या काही कार्यकर्त्यांनी या मुलींना धमकावलं आणि त्यांना डांबून ठेवलं, तसंच रात्री ८ वाजेपर्यंत जर त्यांनी कॉलेजची बदनामी थांबवत आम्ही सांगू त्या पद्धतीनं माध्यमांना बाईट द्यायची अन्यथा तुम्हाला हॉस्टेलमधून आणि कॉलेजमधून काढून टाकू अशी धमकी त्यांना दिली आहे, असा आरोप एनएसयुआयच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, दुसरीकडं एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांकडून एक स्पष्टीकरण समोर आलं आहे की, सीओईपी कॉलेजमधील दोन अनाथ मुलींची दिशाभूल करुन त्यांना कॉलेजविरोधात बोलायला भाग पाडलं आहे. आम्हाला स्कॉलरशीप मिळत नाही अशा पद्धतीनं बोलायचं. काँग्रेसकडून अशा प्रकारचे घाणेरडं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही एबीव्हीपीकडून करण्यात आला आहे.
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सीओईपी कॉलेजमध्ये तैनात करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. देश की आंधी, राहुल गांधी...अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. सध्या या सीओईपी कॉलेजमध्ये मोठा गोंधळ सुरु आहे. काँग्रेसच्या उद्या कार्यक्रमासाठी पुण्यात सध्या महाराष्ट्र काँग्रेसचे बडे नेते दाखल झाले आहेत. त्यामुळं सध्याच्या वादामध्ये आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे देखील उपस्थित आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी गर्दी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.