Ayodhya Ram Temple Ceremony : 'संपूर्ण भारतवासीयांचे श्रद्धास्थान आणि भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आणि प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे निमंत्रण नाकारून, काँग्रेसनेत्यांनी आपली हिंदूविरोधी मानसिकता उघड केली आहे. शिवाय कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचा अपमान केला आहे,' अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला.
तसेच, 'मुस्लिम अनुयायांचा वारसा घेऊन हिंदुद्वेषाच्या राजकारणापोटी राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाची थट्टा करणाऱ्या व निमंत्रण नाकारणाऱ्या काँग्रेसला येत्या निवडणुकीत जनता नाकारेल,' असा इशाराही धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याचबरोबर धीरज घाटे म्हणाले, 'काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे व खासदार अधीररंजन चौधरी यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाकारून हिंदुविरोधी राजकारणाचा आपला अजेंडा उघड केला आहे.'
तसेच 'न्यायालयासमोर प्रभू रामचंद्राचे अस्तित्वच नाकारून राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या सहा शतकांच्या संघर्षास अपशकुन करू पाहणाऱ्या काँग्रेसकडून दुसरी अपेक्षा नव्हतीच, पण हिंदू समाजाच्या या प्रदीर्घ संघर्षाला मिळालेल्या यशामुळे पोटदुखी सुरू झालेल्या काँग्रेसने हिंदुंच्या आराध्य दैवताच्या मंदिराचे राजकारण करावे हे दुर्दैवी आहे आणि हिंदुंच्या भावनांची कुचेष्टा करणाऱ्या काँग्रेसनेत्यांना श्रीरामाने बुद्धी द्यावी,' असा टोलाही त्यांनी लगावला.
याचबरोबर 'राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारणाऱ्या काँग्रेसला आगामी निवडणुकीत नाकारून हिंदू जनता या अपमानाची परतफेड करेल,' असं घाटे म्हणाले आहेत. तसेच याच काँग्रेसने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घातला, याच काँग्रेसने G20 परिषदेवर बहिष्कार घातला, कारगिल विजय दिवसावरही बहिष्कार घातला. जेव्हा जेव्हा देशाची मान अभिमानाने उंचावली तेव्हा तेव्हा काँग्रेसची पोटदुखी बळावली आहे,' अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली.
'समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम जन्मभूमीवरील इस्लामी अतिक्रमण हटवून तेथे रामलल्लाच्या मूर्तीची पुनर्स्थापना व्हावी, यासाठी सहा शतके सुरू असलेल्या संघर्षास संघ-भाजपाचा (bjp) कार्यक्रम म्हणून राजकीय स्वरूप देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल, तर या मुक्ती लढ्याचा हिंदू समाजाला अभिमानच वाटतो,' अशा शब्दांमध्ये धीरज घाटेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.