BJP Politics : आता चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री होतील... : काँग्रेसच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

Chandrakant Patil, Prithviraj Chavan : सत्तासंघर्षाचा निकाल म्हणजे भाजपाला नेतृत्वबदलाची संधी ?
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल येणार आहे. हा निकाल काय लागू शकतो, यावरी महायुतीसह महाविकास आघाडीतील नेते वेगवेगळे कयास लावले जात आहेत. काही नेते या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊन दुसरा एखादा नेता मुख्यमंत्रिपदावर विराजमान होईल, असादेखील अंदाज लावण्यात येत आहे. आता याबाबतच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबजनक विधान केलं आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील अंतिम निकाल बुधवारी दुपारी 4 वाजता विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. या अपात्रता प्रकरणाच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असतानाच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज पुण्यामधील एका कार्यक्रमादरम्यान पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विविध राजकीय विषयांवर आपले मत मांडले.

Chandrakant Patil
Sena MLA Disqualification Result : धाकधूक वाढली; पाहा निकालासाठी कोण-कोण आमदार उपस्थित राहणार?

चव्हाण म्हणाले, 'पुणे लोकसभेसाठी अनेक लोक इच्छुक आहेत. इच्छुकांचे तब्बल 20 अर्ज प्राप्त झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्याची जागा काँग्रेसकडे राहील,' असे वाटत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच 'दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व मित्रपक्षांसमवेत उत्तम चर्चा झाली असून 18 आणि 19 जानेवारीला आणखी एक बैठक होईल,' अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

महाविकास आघाडीत वंचित सहभागी होऊ इच्छित आहे. मात्र आघाडीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकाश आंबेडकर उघडपणे काही भाष्य करतात. यावर चव्हाण म्हणाले, 'वंचित बहुजन आघाडी हा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबतसुद्धा चांगली चर्चा झाली आहे. जागावाटपाची चर्चा मीडियासमोर नाही बंद खोलीत झाली पाहिजे,' असा सल्ला त्यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला.

Chandrakant Patil
Shivsena MLA Disqualification Result : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं, निकाल त्यांच्या बाजूने का लागणार?

राम मंदिराच्या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, 'राम मंदिर आता बांधलं जात आहे आणि आता त्या ट्रस्टने तिथे कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. ज्याला निमंत्रण दिले त्याला जावं नाही जावं तो प्रत्येकाचा प्रश्न आहे. मात्र लोकांच्या मनात आक्रोश आहे. लोक म्हणत आहेत, की राम मंदिरामुळे भाजपची मतं वाढतील, पण असं नाही. जनता निवडणुकीमध्ये भाजपाला जागा दाखवून देईल.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपाला नेतृत्वबदलाची संधी

एकनाथ शिंदेंच्याविरोधात लागला तर मुख्यमंत्री कोण होऊ शकतो, यावर चव्हाण म्हणाले, 'आमदार अपात्रता प्रकरणाच्यानिमित्ताने भाजप राज्यातील नेतृत्वबदल घडवून आणू शकतो. नेतृत्वबदल घडवून आणण्यासाठी भाजपाकडे ही संधी आहे. भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणुका कोणाच्या नेतृत्वामध्ये लढायच्या, याबाबत निश्चित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे ही संधी साधून भाजपा राज्यात नेतृत्वबदल घडवून आणू शकतो.

चंद्रकांत पाटीलही मुख्यमंत्री होऊ शकतात...

'हा बदल घडवून आणताना सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासारखी तीन-चार नावं चर्चेत आहेत. मात्र त्याचबरोबर राजस्थान, मध्य प्रदेशप्रमाणे भाजपा आणखी दुसऱ्या चेहऱ्यांनादेखील मुख्यमंत्रिपदाची संधी देऊ शकतो. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटीलदेखील मुख्यमंत्री होऊ शकतात,' असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Chandrakant Patil
MLA Disqualification Case : घाबरण्याची गरजच काय?; निकालापूर्वीच शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com