Congress News Sarkarnama
पुणे

Pune Congress News: काँग्रेस राबवणार शिवसेना, राष्ट्रवादीचा फार्म्युला! पुण्याला मिळणार नवा कारभारी

Pune Congress President Change: पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आमदार विनोद सुलतानपुरी, सतेज पाटील अंतिम निर्णय घेणार आहेत.

Sudesh Mitkar

Pune News: लोकसभा निवडणुकीपासून पुण्यामध्ये काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला आहे. प्रभारी शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांना बदलावं यासाठी काँग्रेस मधील विविध गटांनी मुंबई, दिल्लीमध्ये वाऱ्या करून फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अनेक घडामोडी देखील घडल्या, मात्र शहराध्यक्ष काही बदलला गेला नाही.

आता शहराध्यक्ष बदलीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पूर्व व पश्चिम भागासाठी दोन स्वतंत्र शहराध्यक्ष निवडले आहेत. त्याच पद्धतीने आता काँग्रेसकडून देखील दोन शहराध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहराध्यक्ष बदलाबाबत दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये पक्षाच्या बैठक झाली. बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तब्बल चार वर्षांपूर्वी कॉंग्रेसच्या शिर्डी येथील अधिवेशनामध्ये एक व्यक्ती, एक पद असा निर्णय झाला होता. त्यानंतर माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी शहराध्यक्ष पद सोडावं लागलं होतं. त्यावेळी प्रभारी शहराध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अरविंद शिंदे यांनी शेवटपर्यंत प्रभारी हा शिक्का पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र ते पूर्ण वेळ शहराध्यक्ष झाले नाहीत. आता अरविंद शिंदे यांच्या जागी आता नवीन शहराध्यक्ष नेमला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस मधील विविध गट शहराध्यक्ष पद आपल्याकडे राहावं यासाठी ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळतील.

तीन दिवस बैठकांचे सत्र

नवीन अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून त्यासाठी हिमाचलचे आमदार विनोद सुलतानपुरी यांची निरीक्षक नेमणूक करण्यात आली आहेत. यासाठी तीन दिवस सुलतानपुरी आणि पुणे शहराचे प्रभारी असलेले सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तीन दिवस बैठका होणार आहेत.

दोन जिल्हाध्यक्ष

पुणे शहराप्रमाणेच पुणे जिल्ह्यासाठीही दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त फॉर्मुला काँग्रेसने निश्चित केला आहे. पूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर सोडून संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच जिल्हाध्यक्ष नियुक्त केला जात होता. मात्र आता बारामती विभागासाठी वेगळा जिल्हाध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे बारामती आणि पुणे आणि. पिंपरी चिंचवड असे तीन भाग केले जाणार असून दोन शहराध्यक्ष आणि दोन जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT