Gokul Milk Election: गोकुळची निवडणूक पुन्हा लांबणीवर? शौमिका महाडिक यांची न्यायालयात धाव

Kolhapur Gokul Milk election may be postponed:कोणत्या संस्था पात्र, कोणत्या अपात्र, याबाबत निर्णय झाल्यानंतर निवडणूक घ्या, या मागणीसाठी शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे.
Shoumika Mahadik
Shoumika MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघातील बाराशे सभासदांचा निर्णय प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे काही संचालकांकडून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र निवडणूक लागल्यास बाराशे संस्था सभासदांची पात्रता किंवा अपात्रता निश्चित झालेली नाही. मात्र याबाबत निर्णय होऊनच गोकुळ दूध संघाच्या निवडणूक लागाव्यात अशी भूमिका गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतली आहे. त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालय यांचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे धाव घेतली आहे.

कोणत्या संस्था पात्र, कोणत्या अपात्र, याबाबत निर्णय झाल्यानंतर निवडणूक घ्या, या मागणीसाठी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक शौमिका महाडिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक वेळेत होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक केव्हा जाहीर होईल, याकडे दूध संस्थांसह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Shoumika Mahadik
NEW Rules: ATM, रेल्वे तिकीट, बँकिंगचे नियम बदलले! तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करणारे 10 महत्वाचे अपडेट्स

नुकतीच सर्किट बेंचमधील याचिका निकाली निघाल्यानंतर तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक जाहीर झाली नाही. याचवेळी अवसायनातील संस्थांची सुनावणी घेण्याचे काम सुरू केले आहे. यातून केव्हाही निवडणूक जाहीर होईल, अशी स्थिती असतानाच संचालक शौमिका महाडिक यांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केल्याचे सांगितले.

Shoumika Mahadik
Income Tax New Rules: पगारदारांसाठी महत्वाची बातमी! 1 एप्रिलपासून 'फॉर्म 16' बंद, 'फॉर्म 130'ची एन्ट्री, टॅक्सचा हिशेब पूर्णपणे बदलणार

संस्था पात्र-अपात्र ठरविण्यासाठीची प्रक्रिया सुरू ठेवून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे चुकीचे होईल. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी सर्किट बेंचमध्ये केल्याची माहिती त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. या याचिकेबाबत अद्याप सुनावणी झालेली नाही. किंबहुना दुग्धच्या सहायक निबंधकांनी निवडणूक कार्यक्रमही जाहीर केलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Shoumika Mahadik
Ashok Kharat News: मनोज जरांगे यांच्यासोबत खरातचा फोटो? हाके म्हणतात, "फडणवीसांनी खरातची जात सांगावी...

निवडणूक लांबणीवर पडल्यास संचालकांची मुदत संपल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती होऊ शकते. त्यामुळे या याचिकेत सर्किट बेंचमध्ये काय निर्णय होतो, येथे निवडणूक घेण्यास स्थगिती मिळते की निवडणूक कार्यक्रम जाहीर करून सहाय्यक निबंधकांकडे पात्र-अपात्र संस्थांची सुनावणी सुरूच ठेवावी, असा निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com