Prashant Jagtap meets Sharad Pawar to discuss the upcoming Pune civic polls and clarifies the NCP’s independent strategy. Sarkarnama
पुणे

Prashant Jagtap : शरद पवारांसमोर दोन्ही राष्ट्रवादींचा 'लेखाजोखा' सादर : पुण्यात नाराज प्रशांत जगतापांच्या मनासारखा निर्णय होणार

Prashant Jagtap on Pune NCP Alliance : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन असा आक्रमक पवित्रा घेतला होता.

Jagdish Patil

Pune News, 06 Dec : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राज्यात विचित्र युती आघाड्या पाहायला मिळाल्या. यामध्ये काही ठिकाणी शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रिक निवडणुका लढवल्या.

स्थानिकच्या या निवडणुकांप्रमाणेच आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या चर्चा सुरू होताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन असा आक्रमक पवित्रा घेतला होता.

त्यानंतर आज प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आगामी पुणे महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचं जाहीर केलं.

शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना, आगामी पुणे महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. शरद पवारांनी सगळ्यांना महाविकास आघाडी म्हणून लढायचं असं सांगितलं असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

प्रशांत जगताप म्हणाले, 'आज शरद पवारांसोबत सविस्तर चर्चा झाली. पुणे महानगरपालिकेत कशी लढत राहील, आपण महाविकास आघाडी सोबत लढलो तर काय होईल, इतर लोकांसोबत युती केली तर काय होईल, याचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडला.

यावेळी शरद पवारांनी पुण्यात आणि राज्यात आम्ही महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू असं सांगितलं.' तर जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या माहितीमुळे आता मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णवराम मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT