IAS Rajesh Deshmukh :  Sarkarnama
पुणे

IAS Rajesh Deshmukh : पुण्याचे कलेक्टर राजेश देशमुखांना जुने फर्निचर विकायचे आहे ?

IAS Rajesh Deshmukh : राजेश देशमुख हे गेल्या तीन वर्षांपासून पुण्याचे कलेक्टर आहेत.

अनुराधा धावडे

Pune News : पुणेकरांनो आपल्या कलेक्टरांना म्हणजे, राजेश देशमुखांना जुने फर्निचर विकायचे आहे. विशेष म्हणजे, हे फर्निचर त्यांच्या मित्राचे आहे. त्यांचा हा मित्र 'सीआरपीएफ' आहे, त्याची बदली झाल्याने त्याच्या घरातील फर्निचर विकायचे आहे. ते विकण्याची चिंता राजेश देशमुखांना पडली आहे. ! आता बघा, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर ही वेळ येईल का ? नाही ना. पण, राजेश देशमुखांवर तशी वेळ आणली गेली आहे. तेही एका व्यक्तीने. म्हणजे, राजेश देशमुखांचे 'फेसबुक' अकाउंट 'हॅक' करून फसवणुकीचा उद्योग केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.

खरे तर हे गंभीर आणि हे विचार करायला भाग पाडणारे आहे की एका 'आयएएस'चे फेसबुक हॅक करून आर्थिक व्यवहार करण्याचे धाडस दाखवले आहे. राजेश देशमुखांबाबतचा हा किस्सा असा आहे. राजेश देशमुख हे गेल्या तीन वर्षांपासून पुण्याचे कलेक्टर आहेत. पुण्यासारख्या शहराची जबाबदारी असल्याने ते प्रचंड बिझी असतात. (Pune Crime News) गेल्या काही काळातील राजकीय उलथापालथीत तर देशमुखांसह राज्यभरातील 'आयएएस' अधिकाऱ्यांचे शेड्यूल बिझीच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही मंडळी सोशल मीडिया प्रामुख्याने फेसबुकवर फारसे 'अॅक्टिव्ह' असतील, असे नाही. खरे तर नाहीतच.

तरीही, देशमुख 'अॅक्टिव्ह' असल्याचे भासवून त्यांच्या ‘फेसबुक' अकाउंटवरून मैत्री केली जात आहे. त्यापलीकडे जाऊन संबंधितांशी जवळीक वाढवून, आपुलकी दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर मोबाईल नंबर घेऊन, ख्याली खुशाली विचारली जात आहे. ओळखीच्या जाळ्यात ओढवून आर्थिक फसवणुकीचाही प्रयत्न होत आहे. असा प्रकार शनिवारी राजेश देशमुखांच्या अकाउंटवरून घडला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला संशय आला आणि देशमुखांच्या वर्तुळातील व्यक्तीशी संपर्क साधला तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघडकीस आले.

याआधी आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे देशमुखांनी जाहीर केले होते, त्यामुळे खळबळ उडाली होती. परिणामी, देशमुखांसह आयएएस अधिकाऱ्यांनाही सावध राहण्याची वेळ आली. अलीकडच्या काळात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना 'टार्गेट' करून त्यांचे फेक अकाउंट तयार केले जात असल्याचे प्रकार वाढले आहे. त्याबाबतच्या तक्रारी आहेत. तरी या असा कोणत्याही अकाउंटवरून लोकांना मेसेज किंवा कॉल गेले असतील, तर ते त्यांनी ते अकाउंट ब्लॉक करावे, असे आवाहन केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT