Vijaykumar Gavit News : पालकमंत्री गावित उदार झाले अन्‌ भंडारा जिल्ह्याला तब्बल दीड तासाचा वेळ दिला...

Bhandara Guardian Minister : पालकमंत्री झाल्यानंतर विजयकुमार गावित हे प्रथमच भंडाऱ्यात येत आहेत.
Vijaykumar Gavit
Vijaykumar GavitSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News : भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री विजयकुमार गावित यांना भंडारा जिल्हा दौऱ्याचा मुहूर्त अखेर मिळाला आहे. नियुक्तीनंतर पहिल्यांदाच येत्या २६ ऑक्टोबर रोजी गावित हे जिल्ह्यात येत आहे. मात्र, त्याचा हाही दौरा धावता राहणार आहे. कारण पालकमंत्री गावित यांचा गोंदिया जिल्ह्याचा विशेष दौरा असल्याने भंडारा जिल्ह्याला ते केवळ दीड तास देणार आहेत. दरम्यान, नियुक्तीनंतर पालकमंत्री गावित यांचा हा पहिला दौरा असल्याने जिल्हा प्रशासन स्वागतासाठी कामाला लागले आहे. (Guardian Minister Vijay Kumar Gavit gave only one and a half hours to Bhandara district)

पालकमंत्री विजयकुमार गावित यांचा पहिला दौरा असल्याने ते जिल्ह्याला पूर्ण वेळ देणार ही जिल्हावासीयांची अपेक्षा असतानाही गावितांची ही दीड तासाची धावती भेट असणार आहे. कारण मुळात गावित यांचा मुख्य दौरा गोंदियामध्ये आहे. देवरी येथे विविध विकासकामांच्या उद्‌घाटन कार्यक्रमात गावित हजेरी लावणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijaykumar Gavit
Cabinet Expansion : सुनील शेळकेंनी टायमिंग साधलं; मावळासह ‘एक्स्प्रेस वे’वर झळकलेल्या बॅनर्सची चर्चा!

देवरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन, विविध कामांचे भूमिपूजन व त्यानंतर कचारगढ येथे भेट अशी त्यांच्या दौऱ्याची रूपरेषा आहे. गावितांचा २६ ऑक्टोबरला जास्तीत जास्त वेळ गोंदिया जिल्ह्यात देवरीत जाणार आहे. त्यामुळे त्यांची ही भंडारा भेट केवळ औपचारिक झाली आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्याला नुकताच महापुराचा फटका बसला होता. त्याच्या नुकसानभरपाईबाबत अद्याप कळले नाही. जिल्ह्यातील शेतकरी धानावर पडलेला मावा, तुडतुडाने त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक अजूनही झालेली नाही, त्यामुळे निधीची वाणवा आहे. विकासकामे निधीअभावी ठप्प आहे, अशी सर्व यादी तयार असताना पालकमंत्री गावित भंडारा जिल्ह्यात दीड तासाची धावती भेट घेऊन कसे पूर्ण करणार, असा सवाल जिल्हावासीयांना पडला आहे.

Vijaykumar Gavit
Chandrakant Patil News : मी कशालाही तयार असतो...माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

महसूल-पोलिस प्रशासन अलर्ट

दरम्यान, पालकमंत्री भंडारा जिल्ह्यात येणार म्हणून महसूल आणि पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पालकमंत्र्यांना खूश करण्यासाठी दोन्ही विभागाने नुकताच कारवाईचा सपाटा लावला आहे. वाळू तस्करी, दारू, सट्टापट्टी, जुगार अड्डे अशांवर थातूरमातूर कारवाई केली जात आहे.

Vijaykumar Gavit
Chandrapur Congress : चंद्रपूर काँग्रेसमध्ये नवनियुक्त्या; देवेंद्र बट्टे जिल्हा उपाध्यक्ष, तर झाडेंकडे शहराची धुरा!

अचानक दोन्ही विभाग कर्तव्यदक्ष कसे झाले, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली. ही सर्व पालकमंत्री यांच्या ‘गुड बुक’मध्ये येण्यासाठीचा आटापिटा असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईने जिल्ह्यात अवैध धंदे फोफावले असल्याचे स्पष्ट होत आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आगमनानिमित जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

Vijaykumar Gavit
Lalit Patil News Update : ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा साथीदार पुणे पोलिसांच्या ताब्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com