Hingoli Loksabha Constituency : खासदार फुटल्याने काँग्रेसचा हिंगोलीवर डोळा; तर उद्धव सेना गद्दारीचा वचपा काढण्यासाठी आतुर

Mahavikas Aghadi News : जागावाटपासंदर्भात यापूर्वी ज्या प्राथमिक बोलणीसाठी बैठका झाल्या त्यात या विषयावर चर्चाही झालेली आहे.
Hingoli Loksabha Constituency News
Hingoli Loksabha Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : आगामी लोकसभा निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. नव्या आघाड्या, युतीसाठी प्रयत्न अन् जागावाटपाचे सूत्र ठरवण्यासाठी बैठकांचे सत्र राज्याची राजधानी मुंबईत सुरू आहे. (Mahavikas Aghadi News) महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी या दोन पक्षांत पडलेल्या फुटीनंतर मराठवाड्यात अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये फेरफार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Hingoli Loksabha Constituency News
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी काय केले ? समाजाच्या प्रश्नाने नेते घायाळ...

यापैकीच एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे (Hingoli) हिंगोली. २०१४ च्या मोदी लाटेत राज्यात काॅंग्रेसची लाज ज्या दोन मतदारसंघांनी राखली होती, त्यात मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या दोन मतदारसंघांचा समावेश होता. २०१९ मध्ये वंचित आघाडी व एमआयएममुळे काॅंग्रेसला (Congess) फटका बसला होता. अडीच वर्षांच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे काॅंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले.

भाजप विरोधातील आघाडी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अधिक मजबुतीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. (Shivsena) अशावेळी तिन्ही पक्षांना तडजोडी आणि त्यागाची भूमिका ठेवावी लागणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हा शिवसेना-भाजप युतीकडून निवडून आला होता. शिवसेनेतील फुटीनंतर हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २०१४ मध्ये मोदी लाट थोपवणाऱ्या काँग्रेसला इथे पुन्हा संधी मिळावी, असा प्रयत्न माजी मुख्यमंत्री व नेते अशोक चव्हाण यांनी सुरू केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागावाटपासंदर्भात यापूर्वी ज्या प्राथमिक बोलणीसाठी बैठका झाल्या, त्यात या विषयावर चर्चाही झालेली आहे. आता या चर्चेला मूर्तरूप देण्याची वेळ आली आहे. अशोक चव्हाण आपले समर्थक डाॅ. अंकुश देवसरकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे, पण त्यांना आमदार रजनी सातव यांच्या समर्थकांसह इतर पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीत झालेल्या बैठकीत याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले होते.

त्यामुळे हिंगोली लोकसभेवर दावा सांगताना अशोक चव्हाणांना आधी पक्षातील विरोध मोडून काढवा लागेल, त्यानंतर ठाकरे गटाकडून हा मतदारसंघ सोडवून घेण्याची कसरत करावी लागेल. त्यामुळे हिंगोलीवर काँग्रेसने दावा जरी केला असला, तरी ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी अशोक चव्हाणांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना या पाच जागा लढविल्या होत्या.

Hingoli Loksabha Constituency News
Dharashiv Politics : धाराशिव लोकसभेत प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारीसाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरू

तर राष्ट्रवादी काँग्रेने बीड, धाराशिव , परभणी‌ या तीन जागा. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट सोबत आल्याने आठ जागा तीन पक्षांमध्ये विभागल्या जाणार आहेत. हिंगोलीची जागा काँग्रेसला सुटण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते आग्रही आहेत. ही जागा आम्हाला सुटणार आहे असा दावा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत. ही जागा लढविण्यासाठी डॉ. अंकुश देवसरकर यांच्यासह अनेक मातब्बर नेते उत्सुक आहेत. डॉ. अंकुश देवसरकर यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. तसेच अशोक चव्हाण यांच्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती म्हणजे त्यांचे ब्रॅंडिंग असल्याचे बोलले जाते.

गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील व काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यात लढत झाली. या वेळी झालेल्या मतदानापैकी पन्नास टक्के हेमंत पाटील यांना मिळाले होते, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने पावने दोन लाख मते घेतली होती. आता हेमंत पाटील विरोधकांच्या तंबूत असल्यामुळे काँग्रेसमधील डॉ. अंकुश देवसरकर, आमदार प्रज्ञा सातव, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर या इच्छुकांनी उचल खाल्ली आहे.

Hingoli Loksabha Constituency News
Maratha Reservation : नेत्यांना जावं लागतंय मराठ्यांच्या रोषाला सामोरे; २४५ गावांमध्ये 'नो एन्ट्री'

उमरखेड तालुक्यातील देवसरी येथील डॉ. अंकुश देवसरकर यांचे नाव सध्या या चर्चेत आघाडीवर आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा कळमनुरी, हिंगोली या भागातून गेली होती. मोठा प्रतिसाद तेव्हा मिळाला होता. उमरखेड हादगाव या मतदारसंघात काँग्रेसचे संघटनात्मक पातळीवर चांगले काम आहे.

या वातावरणाचा फायदा पक्षाला होईल, असे पदाधिकाऱ्यांना वाटते. किनवट व वसमत या दोन मतदारसंघांत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ मिळाले, तर काँग्रेसचा विजय सोपा होईल, असा विश्वास काँग्रेसला वाटतो. आता तडजोड आणि त्यागाची भूमिका कोण घेतो? यावरच कोण लढणार हे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com