Chandrakant Patil : Mohan Joshi Sarkarnama
पुणे

Pune Congress News : 'चंद्रकांत पाटलांनी हात वर केले, काँग्रेसने प्रभू रामांना साकडे घातले..' ; मोहन जोशींनी डिवचलं !

Mohan Joshi On Chandrakant Patil : कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप..

सरकारनामा ब्यूरो

Pune Congress News : कसबा विधानसभेच्या काँग्रेसच्या विजयाने भारतीय जनता पक्षाला (BJP) झुकवले आहे. काँग्रेसने यासाठी प्रभू रामचंद्राच्या चरणी साकडे घातले होते. आमचे हे साकडे मान्य झाले. प्रभू श्रीराम भाजप सोबत नाही तर, आमच्यासोबत आहेत. हेच यावरूनच सिद्ध होत आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे (Congress) प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.

मोहन जोशी (Mohan Joshi) म्हणाले, "मुळातच पुणेकरांना मिळणारी घरपट्टीची सवलत काढून घेण्याचे काही कारणच नव्हते. महापालिका स्वायत्त संस्था आहे. त्यांनी विशेष ठराव करून अनेक वर्षांपूर्वी ही सवलत लागू केली होती. पैसे कसे काढता येतील, याच विचारात असलेल्या भाजप सरकारने ही सवलत वेगवेगळी कारणे दाखवत काढून घेतली."

ठया कारणांचा निपटारा सरकारला त्यांच्या स्तरावर आधीच करता येणे शक्य होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. नागरिकांकडून ओरडा सुरू झाल्यानंतरही त्याकडे शिंदे फडणवीस सरकारने लक्ष दिले नाही. वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही. पुणेकर जनतेला फसवत राहिले,ठ असा आरोपही जोशी यांनी केला.

महापालिका प्रशासनाने ही सवलत काढून घेतलेली बीले तर पाठवलीच, शिवाय त्यात ४ वर्षांपासूनची थकबाकीही दाखवली. साधी सदनिका असलेल्या कुटुंबांवरही यामुळे २० हजार रूपयांपेक्षा जास्त बोजा पडला, असे जोशी म्हणाले.

"काँग्रेसने या विरोधात सातत्याने आंदोलने केली. अखेर मंत्रीमंडळाने याबाबत ठराव केला, मात्र तरीही प्रशासन बधत नव्हते. मंत्रीमंडळही मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी उदासिन होते. पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी तर या विषयाची माहिती नसल्यासारखे हात वर केले. काँग्रेसने अखेर प्रभू रामचंद्रांचरणी साकडे घातल्याचे आंदोलन केले. आता सरकारला सुबुद्धी आली व त्यांनी हा निर्णय अंमलात आणण्याविषयी महापालिकेला क‌ळवले. त्यामुळे या गोष्टीचे फुकटचे श्रेय भाजपच्या शहरातील एकाही नेत्याने घेऊ नये, हा पुणेकरांचा विजय आहे व त्यांनाच याचे खरे श्रेय आहे," असे जोशी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT