Atiq Ahamed Case update : गँगस्टर अतिक अहमदच्या खूनानंतर आता त्याची पत्नी शाइस्ता परवीनचा (Shaista Parveen) शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. शाइस्ता या उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असून, त्यांच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलिस आणि एसटीएफची अनेक पथके शाइस्ताला शोधण्यासाठी कामाला लागले आहेत.
शाईस्ता परवीन यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अतिकची पत्नी शाइस्ता इतर कुठेही नसून, प्रयागराजमध्येच आहे. यादरम्यान त्यांच्यासोबत इतरही अनेक लोक असतात, जे त्यांना प्रत्येक टप्प्यावर मदत करत असतात. बुरखा परिधान केल्यामुळे शाईस्ताला शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.
एका हिंदी वाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार, शाईस्ता यांच्यासोबत काही महिला आहेत आणि त्याही नेहमी बुरख्यात असतात. त्यामुळेच पोलिसांना शाईस्ताचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. शाइस्तेचा पती अतिक आणि मेहुणा अश्रफ यांच्या अंत्यसंस्कारालाही शाईस्ता समोर आल्या नव्हत्या, मुलगा असदच्या दफनविधीलाही असतानाही शाईस्ता या विधीस आल्या नव्हत्या. उमेश पाल खून प्रकरणानंतर फरार शाईस्ता प्रयागराज-कौशांबीच्या कचार परिसरात असल्याची शक्यता आहे.
अतिकची पत्नी शाइस्ता कोण आहेत?
शाईस्ता या प्रयागराजमधील दामुपर गावची रहिवासी आहेच. चार बहिणी आणि दोन भावांमध्ये त्या सर्वात मोठ्या आहेत. तिचे वडील मोहम्मद हारून हे निवृत्त पोलीस हवालदार आहेत. त्यांचा एक भाऊ मदरशात प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. शाइस्ताने किडवाई गर्ल्स इंटर कॉलेज, हिम्मतगंज, प्रयागराज येथून पदवी प्राप्त केली आहे.
त्यांनी 1996 मध्ये शाईस्ताने अतीकशी लग्न केले आणि या जोडप्याला पाच मुले आहेत. अतिकशी लग्न केल्यानंतर शाईस्ताने हळूहळू अतिकच्या कुकर्मात साथ द्यायला सुरुवात केली. फेब्रुवारीमध्ये उमेश पाल हत्याकांडातही शाइस्ताला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.