Pune News : पुणे जिल्ह्यातील 17 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत कमकुवत झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगर परिषदेमध्ये 8 ठिकाणी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडणूक रिंगणात उभा करता आलेला नाही.
उमेदवार मिळवण्यात अपयशी ठरल्याने काँग्रेसने निवडणूक लढण्यापूर्वीच यानगरपालिकांमध्ये मैदान सोडले असल्याचे बोलले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी एकूण 398 जागांसाठी 2,671 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, पण काँग्रेसचा पंजा बहुतेक ठिकाणी अदृश्य आहे.
एकेकाळी दिग्गज नेत्यांचे बालेकिल्ले, आता वाळवंट
पुणे जिल्ह्याहा काँग्रेसचा प्रबळ गड मानला जात होता. एकेकाळी येथे अनेक दिग्गज नेते या भागामध्ये काँग्रेसचे नेतृत्व करत होते. भोर हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात असे जिथे मागील निवडणुकीत पक्षाने सर्व 17 जागा जिंकल्या होत्या.
मात्र त्या ठिकाणचे माजी आमदार असलेले संग्राम थोपटे भाजपमध्ये गेले आणि काँग्रेसला त्या ठिकाणी उमेदवार मिळणे ही अवघड झालं असल्याचे चित्र आहे. सासवड मध्ये देखील माजी आमदार संजय जगताप भाजप मध्ये गेल्यानंतर हीच परिस्थिती आहे. यामुळे पक्षाची पायाभूत रचना कमकुवत झाल्याने आता उमेदवार शोधण्यातच पक्षाला अडचण येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या अर्ज छाननीनंतर (18 नोव्हेंबरला) जाहीर झालेल्या यादीतून हे चित्र स्पष्ट होते. सासवड, राजगुरुनगर, तळेगाव, शिरूर, भोर, आळंदी, मंचर आणि वडगाव माळेगाव या आठ ठिकाणी काँग्रेसला उमेदवारही मिळालेले नाहीत
काँग्रेसला उमेदवार न मिळालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींचा विचार केल्यास सासवड मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचा प्रभाव आहे. राजगुरुनगर आणि तळेगाव दाभाडे येथे भाजप-राष्ट्रवादीची थेट लढत अपेक्षित आहे. शिरूर मध्ये भाजप मजबूत असल्याचं पाहायला मिळतात. भोर पूर्वी काँग्रेसचा किल्ला, आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजप प्रभाव ठिकाणी दिसून येत आहे.
आळंदीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप मजबूत असून मंचर नवीन नगरपंचायत, पहिल्यांदाच निवडणूक होत असून काँग्रेसचा प्रभाव नगण्य आहे, वडगाव माळेगाव भाजप-राष्ट्रवादी लढत अपेक्षित, काँग्रेस अनुपस्थित या ठिकाणी दिसत आहे.
या ठिकाणी एकूण 120 हून अधिक जागा आहेत, ज्या काँग्रेसने सोडल्या. उलट, बारामतीसारख्या ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने 8 उमेदवार बिनविरोध जिंकले, तर इतर ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) सक्रिय आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.