Pune Crime News Sarkarnama
पुणे

Pune Crime News : हिंजवडीतील कोट्यवधी रुपयांच्या मेडिकल प्रवेश फसवणुकीचं 'पुणे कनेक्शन'; अॅडमिशनची बोगसगिरीही उघड

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना काही कोटी रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी आयटी पार्क असलेल्या हिंजवडीत उघडकीस आला. त्याबाबत 'सरकारनामा'ने प्रथम बातमी देऊन या फसवणुकीचा भांडाफोड केला होता. त्याचे आता पुणे कनेक्शन समोर आले आहे.

पुणे महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोरी यावर्षी ऑगस्ट महिन्यात उघड झाली होती. तेथे एमबीबीएसला प्रवेश देण्यासाठी त्या कॉलेजचे डीन आशिष बनगिनवार यांनी विद्यार्थ्याच्या पालकाकडे १६ लाख रुपयांची लाच मागून त्यातील दहा लाख रुपये घेताना त्यांना त्यांच्याच केबिनमध्ये पुणे एसीबीने आठ ऑगस्टला पकडले होते. त्यानंतर पुण्यातच नाही, राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.

पुणे महापालिका(PMC) प्रशासनाने या लाचखोरीची दखल घेत बनगिनवार यांना निलंबित केले. याच मेडिकल कॉलेजात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असे सांगून एका महिला आणि तिचे दोन साथीदार अशा तीन ठगांनी काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लाखो रुपये घेतले. मात्र, त्यांना अॅडमिशन न मिळाल्याने हे रॅकेट समोर आले.

हिंजवडी पोलिस ठाण्यात शनिवारी या मेडिकल अॅडमिशनच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. त्यात सिद्धार्थ रावत ऊर्फ शुभमसिंग जयबहादूरसिंग आणि विजेंद्र शर्मा हे दोन आऱोपी परप्रांतीय, तर तिसरी महिला आरोपी महाराष्ट्रायीन आहे. त्यांनी आतापर्यंत सात जणांना दोन कोटी रुपयांना फसविल्याबद्दल हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.(Crime News)

पुणे येथील वाजपेयी मेडिकल कॉलेजसह सांगलीतील प्रकाश पाटील मेडिकल कॉलेज, जळगावातील उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धुळ्यातील एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो,असे सांगून या त्रिकूट आरोपींनी एकेका विद्यार्थ्याच्या पालकाकडून किमान १३ लाख ते ३८ लाख रुपये घेतलेले आहेत. पूर्ण नावही माहीत नसलेल्या आरोपींवर फसल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्वास ठेवून लाखो रुपयांची कॅश त्यांच्या हवाली कशी केली, याबद्दल पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.(Police Action)

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT