Narendra Bhondekar News : आमदार भोंडेकरांना मुख्यमंत्र्यांवर नाही विश्वास ? सरकारने ओबीसी आंदोलन सोडवले, पण भोंडेकरांनी पेटवले

Bhandara Politics :..तर वेळ पडली तर आमदारकी सोडण्याचाही आमदार भोंडेकरांचा इशारा
MLA Narendra Bhondekar
MLA Narendra Bhondekar Sarkarnama
Published on
Updated on

Bhandara Political News: शिंदे गटाचे समर्थक आणि अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज भंडाऱ्याच्या पवनी येथे ओबीसी समर्थनात बाइक रॅली काढली. शेकडो बाइकस्वारांना घेऊन आमदार भोंडेकर स्वतः रॅलीचे नेतृत्व करत पवनी-भंडारा येथे मार्गक्रमण केले. हे आंदोलन ओबीसी समर्थनात असले तरी उपस्थित बाइकस्वार हे ओबीसींपेक्षा शिवसैनिक जास्त असल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले ओबीसींचे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने शनिवारी मागे घेण्यात आले. मात्र, असे असतानाच आज १ ऑक्टोबरला भोंडेकर यांनी ओबीसींच्या मागण्या घेऊन काढलेली बाइक रॅली पुन्हा शांत होत असलेल्या ओबीसी आंदोलनात ठिणगी टाकण्याचे काम केले आहे. त्यामुळे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना शिंदे सरकारवर आणि त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नाही का?, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे.

MLA Narendra Bhondekar
Akola Lok Sabha Constituency : अकोला लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी; 'ही' नावे चर्चेत...

"आम्हाला विश्वास देऊन आंदोलन सोडवायला लावले. मात्र, स्वतः सत्ता पक्षाला समर्पित आमदाराला सरकारवर विश्वास नाही का?" असा सवाल आता ओबीसी नेते विचारत आहेत. तर ओबीसींच्या मागण्या घेऊन आपण आपली आमदारकीही सोडून देऊ, असा इशारा आमदार भोंडेकर यांनी शिंदे सरकारला दिल्यामुळे शिंदे-भोंडेकर यांच्यातील संबंध दुरावल्याचे बोलले जात आहे.

सत्ता स्थापनेवेळी आमदार भोंडेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे संबंध जवळचे मानले जायचे. पण शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने भोंडेकर नाराज झाल्याची चर्चा आहे. भंडाऱ्याला स्थानिक पालकमंत्री हवा आहे, अशा एक ना अनेक मुद्द्यांवर भोंडेकरांनी सरकारला घरचा आहेर दिला.

दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनीही भोंडेकरांना खूष करण्यासाठी आमदार भोंडेकर यांच्या मतदारसंघात निधीची खैरात वाटली आहे. असे असले तरी आमदार भोंडेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात आता दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मराठा समाजानंतर ओबीसी समाजाच्या आंदोलनाने सरकार आधीच पेचात सापडले आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शिष्टाई करत ओबीसी समाजाचे आंदोलन मागे घेण्यात आले. पण भोंडेकर हे शिंदे गटाचे समर्थक आमदार असतानाही त्यांनी आज ओबीसींच्या मुद्द्यांवर रॅली काढली. बाइक रॅलीत ओबीसी कमी आणि शिवसैनिक जास्त असले तरी आज रॅली काढण्याचे कारण मात्र अनेकांना कळले नाही.

दरम्यान, आजची रॅली सरकारला पुन्हा वेठीस धरणारी मानली जात आहे. भोंडेकर यांनी ओबीसी मुद्द्यांवर आमदारकी सोडावी लागली तरी सोडील, असा इशारा दिला आहे. तसेच बाइक रॅलीच्या समारोपप्रसंगी आयोजित सभेत शिंदे सरकारला मारलेल्या "टोमण्या" वरून "मन मे कुछ जुबा पर कुछ" अशी स्थिती आमदार भोंडेकर यांची झाली आहे.

Edited By- Ganesh Thombare

MLA Narendra Bhondekar
Nashik Politics : दिंडोरी मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली; १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com