Manoj Jarange Patil Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Warrant : कोर्टात हजर राहण्याचे आदेश; जरांगेंच्या अटकेवर वकीलांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले...

Pune Court : 2013 मधील प्रकरणावरून कोर्टाने जरांगे पाटील यांच्याविरोधात वॉरंट काढले. आता कोर्टाने त्यांना 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्याची आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ठाम आहे. त्यासाठी त्यांनी सरकारविरोधात पुन्हा एकदा पाच दिवसांचे उपोषण केले. दरम्यान, त्यांच्याविरोधात पुणे कोर्टाने अटक वॉरंट काढल्याने राज्यात मोठ्या उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2013 मधील प्रकरणावरून कोर्टाने जरांगे पाटील यांच्याविरोधात वॉरंट काढले. आता कोर्टाने त्यांना 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारवर टीका करत तारखेला हजर राहणार नसल्याचे जरांगेंनी सांगितले. यावर त्यांचे वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी काही बाबींवर प्रकाश टाकला.

अॅड. निंबाळकर म्हणाले, जरांगेंविरोधात Manoj Jarange Patil काढलेले अटक वॉरंट हे 2013 मधील केसी संबंधित आहे. त्यात जरांगेंसह दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यात कोर्टाने १५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल झाला पण कित्येक वर्षे चार्जशिट दाखल झाले नव्हते. दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर कोर्टाने त्यांच्याविरोधात दोन वेळा समन्स काढले होते. कोर्टाचे ते त्यांच्यापर्यंत पोचले नव्हते. मात्र ते त्यांना लागू झाले नव्हते, याकडेही निंबाळकरांनी लक्ष वेधले.

या प्रकरणी कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन दिलेला होता. जामीन दिल्यामुळे त्यांना कोर्टात येण्याची आवश्यकता नव्हती. यानंतरही कोर्टाने वॉरंट काढले होते. त्यानुसार जरांगे कोर्टात हजर राहिले होते. वॉरंट कॅन्सल करून घेतले होते. आता परत त्यांची तारीख होती. मात्र उपोषणा बसले असल्याने ते येऊ शकले नाहीत. डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्यास सांगितले नाही. मात्र इतर दोन आरोप हजर होते. त्यामुळे जरांगेंविरोधात वॉरंट काढले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोर्टाने आता जरांगे पाटील यांना 2 ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्यांना हजर राहावे लागेल. मात्र ते आले नाही तर कोर्ट आरोपी कुठल्या कारणास्तवर हजर राहिला नाही, हे पाहून पुढील आदेश देईल, असेही हर्षद निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण अटक वॉरंटमुळे स्थगित केले. आता त्यांचा 11 ऑगस्ट रोजी पुण्यात दौरा आहे. तत्पुर्वीच त्यांनी 2 ऑगस्ट रोजी सुनावणी आहे. मात्र हे वॉरंट म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव असल्याचा आरोप जारांगेंनी केला करून आपण सुनावणीलाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले. आता ते सुनावणीला येणार का, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT