police sarkarnama
पुणे

Pune Crime News : महिला पोलिस अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना

Akshay Sabale

Pune News : रस्त्यात थांबविल्याच्या कारणावरून वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील मध्यवस्तीत बुधवार चौकात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 109 आणि 132 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित संजय फकीरा साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोलिस ( Police ) वाहतूक नियमन करत होते. तेव्हा पोलिसांनी एका वाहनचालकाला थांबविल्यानंतर साळवेने पोलिसांसोबत वादावादी केली. त्यानंतर एकानं बाटलीतील पेट्रोल महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर टाकलं. पण, नेमकं लायटर न पेटल्यानं पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सुदैवानं बचावले.

याप्रकरणी महिला पोलिस अधिकाऱ्यानं "आमचा पुनर्जन्मच झाला," अशी प्रतिक्रिया 'सकाळ'ला बोलताना दिली आहे. "आमच्या अंगावर पेट्रोल टाकल्यानंतर नेमके लायटर उलटे धरल्यानं आमचा जीव वाचला आहे. आमचा पुनर्जन्मच झाला आहे. या धक्क्यातून सावरायला वेळ लागला. एक तासभर तरी मला बोलता आलं नाही," असं महिला अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

तर, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर कारवाई करण्याचं असल्याचं सांगितलं आहे. "या संदर्भात आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल," असं अमितेश कुमार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT