Dnyaneshwar Katke Sarkarnama
पुणे

Daund Firing Case: करतंय कोण आणि भरतंय कोण! पराक्रम आमदार मांडेकरांच्या भावाचा, शिव्या आमदार कटकेंना!

MLA Dnyaneshwar Katke Files Defamation Complaint in Daund Firing Case : पुणे इथल्या दौंड गोळीबार प्रकरणात बदनामी झाली म्हणून, शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

Pradeep Pendhare

Pune Crime News: पुणे इथल्या दौंड गोळीबार प्रकरणात वेगवेगळे 'ट्विस्ट' आले. शेवटी प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर-वेल्हा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भावापर्यंत येऊन ठेपलं.

मात्र यात सर्वाधिक बदनामी झाली ती, शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके ऊर्फ माऊली आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांची! गोळीबार प्रकरणात, समाज माध्यमांवर बदनामी केली म्हणून आमदार कटके यांच्या समर्थकांनी वाघोली, उरुळी कांचन, रांजणगाव आणि लोणी काळभोर पोलिसात कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत.

दौंड गोळीबार प्रकरणात सुरवातीला आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची माहिती समोर येत होती. पुढं याप्रकरणाशी पुण्यातील (Pune) शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके आणि अनंता कटके यांच्याशी जोडण्यात आली. समाज माध्यमांवर तसे मेसेज व्हायरल झाले. पण कटके बंधूंचा या प्रकरणाशी कुठेही संबंध नव्हता.

समाज माध्यमांवर बदनामीसाठी मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कटके यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पुण्यातील वाघोली, उरुळी कांचन, रांजणगाव आणि लोणी काळभोर पोलिसात (Police) कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत.

आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे बंधू अनंता यांनी वाघोली पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. रविकांत वर्पे, अनिल जगताप, विकास लवांडे आणि महादेव बालगुडे यांच्याविरुद्ध ही तक्रार आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांनीही विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या गोळीबार प्रकरणात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर याचे नाव समोर आले.

प्रकरण काय?

वाखारी इथल्या न्यू अंबिका कला केंद्रावर सोमवारी रात्री साडेदहा ते 11 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. या प्रकरणात सत्ताधारी आमदाराचा भाऊ असल्याची तक्रार होती. सुरवातीला पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होता. विरोधकांनी पोलिसांच्या अन् सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. या दबावानंतर 36 तासांनी पोलिसांनी स्वतः पत्रकार परिषद घेत, गोळीबाराचा प्रकार स्पष्ट केला. अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी चार संशयितांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

आमदाराच्या भावाचा प्रताप

बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीवर दौंडच्या यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बाळासाहेब मांडेकर हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोर-वेल्हा मतदारसंघातील आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ निघाला. शंकर मांडेकर यामुळे अडचणीत सापडले आहेत. 2024 च्या विधानसभा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून पहिल्याच निवडणुकीत ते आमदार झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT