Illegal Gender Detection Racket .jpg Sarkarnama
पुणे

Pune Crime News: पुण्याला हादरवणारं कांड; 2 वर्षांत तब्बल 500 गर्भपात; पोलिसांच्या तपासात डोकं सुन्न करणारी माहिती समोर

Daund illegal prenatal sex determination: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सुरू असलेल्या एका बोगस डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्यानं राहत्या घरातच गोपनीयरित्या सुरू असलेल्या गर्भलिंग तपासणी रॅकेट उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

Deepak Kulkarni

Pune News: काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता आणि श्रीरामपूर पोलिसांनी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी करत बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात दोन डॉक्टर आणि एका एजंटला ताब्यात घेतलं होतं. यानंतर आता दौंड तालुक्यातील केडगाव येथील गर्भलिंग निदानच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सुरू असलेल्या एका बोगस डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्यानं राह्त्या घरातच गोपनीयरित्या सुरू असलेल्या गर्भलिंग तपासणी रॅकेट उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानं जिल्हा प्रशासनासह पोलिस व आरोग्य यंत्रणाही हादरली आहे.

सोशल मीडियावर गर्भलिंग निदानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती. या व्हिडीओमागचा सूत्रधार शोधण्यासाठी पोलिसांनी वेगानं तपासाची चक्रे फिरवली.

यवत पोलीस ठाण्यात गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यवत पोलिसांत माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन गुजर यांच्यावतीनं तक्रार देण्यात आली होती.

बोगस डॉक्टरकडून सुरू असलेल्या या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या मदतीनं घरातच गर्भलिंग तपासणी केली जात होती. या तपासणीसाठी संबंधितांकडून 35 ते 50 हजार रुपये फी आकारली जात होती. या प्रकऱणात यवत पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

यवत पोलिसांनी केलेल्या कसून तपासात दौंड तालुक्यातील केडगाव येथे सुरू असलेल्या गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये 7 ते 8 डॉक्टरांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केल्या आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण रॅकेटमध्ये गेल्या 2 वर्षांत तब्बल 500 हून अधिक गर्भपात झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या ठिकाणी गर्भलिंग निदान झाल्यानंतरच संबंधित महिलांना गर्भपातासाठी पाठवले जात होतं, अशी माहिती समोर येत आहे.

या प्रकरणात यवत पोलिसांनी डॉ.अतुल जाधव याला अटक केली असून आणखी 2 डॉक्टर अद्याप फरार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दौंड तालुक्यातील केडगाव बोरीपार्धी परिसरात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आल्यानं कारवाईची मागणी जोरदारपणे सुरू होती.

या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे थेट अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहचल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे केडगाव परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या रॅकेटमागे मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तसेच केडगाव-बोरीपार्धी परिसरातील गर्भवती महिलांना गुप्तपणे गर्भलिंग निदान चाचणी करून दिली जात होती. चाचणी स्थानिक पातळीवर केली जात असली तरी त्यानंतर गर्भपातासाठी संबंधित महिलांना अहिल्यानगर जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टरांकडे पाठवले जात होते अशी माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT