Mamata Banerjee News: ममता बॅनर्जींना 24 तासांतच दोन धक्के, टीएमसी पक्ष फुटल्यानंतर भाचे अभिषेक बॅनर्जींची धडधड वाढवणारी अपडेट

TMC News: पश्चिम बंगालमध्ये राजकीय हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे.टीएमसी पक्षाबाबत ज्याची भीती होती, तेच घडलं आहे. टीएमसीच्या 80 पैकी 58 अर्थात दोन तृतीयांश आमदारांनीच बंडखोरी केल्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjee News Sarkarnama
Published on
Updated on

West Bengal News: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकापाठोपाठ एक हादरे बसताना दिसून येत आहे.एकीकडे तृणमूल काँग्रेसच्या जवळपास 60 बंडखोरी केल्यामुळे पक्षच फुटला आहे.यानंतर काहीच वेळात आता टीएमसीचे खासदार व भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. यामुळे 24 तासांच्या आतच ममता बॅनर्जींना दोन मोठे हादरे बसले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे. टीएमसी पक्षाबाबत ज्याची भीती होती, तेच घडलं आहे. टीएमसीच्या 80 पैकी 58 अर्थात दोन तृतीयांश आमदारांनीच बंडखोरी केल्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

टीएमसीचे खासदार व ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी ईडीच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. ईडी पथकाकडून ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी करण्यात येत आहे. हा अभिषेक बॅनर्जींसह ममतादीदींनाही मोठा धक्का मानला जात आहे.

ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीच्या 59 आमदारांनी बंडखोरी करत ममता बॅनर्जी यांना धक्का दिला आहे. यानंतर आता अभिषेक बॅनर्जींच्या कोलकाता येथील घरी ईडी पथक धडकल्यामुळे राजकीय वर्तुळात ममता बॅनर्जींसाठी दुहेरी धक्का असल्याचं बोललं जात आहे.

Mamata Banerjee
BJP Crime News: भाजप नेत्याचा मध्यरात्री नग्नावस्थेत कॉल,म्हणाला,'एका तासासाठी घरी...?'; महिलेच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचा दणका

ऋतब्रता बॅनर्जी यांची विधिमंडळ विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी टीएमसीच्या 59 आमदारांच्या गटाला मंजुरी दिली आहे. यानंतर जावेद खान, संदीपान साहा आणि सिउली साहा यांची टीएमसीच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर अख्रुझमान यांची मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यापूर्वी सोमवारी पश्चिम बंगाल सीआयडीचे पथक सोमवारी डायमंड हार्बर येथील खासदार तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

Mamata Banerjee
MLA verdict : कोर्टाचा अभूतपूर्व निकाल, 10 वर्षांनंतर आमदारकी रद्द; पराभूत उमेदवाराला केलं विजयी घोषित

बालीगंजचे नवनिर्वाचित आमदार सोभनदेव चट्टोपाध्याय यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या बनावट सह्यांशी संबंधित एका प्रकरणाच्या संदर्भात ही भेट आहे. सीआयडी पथकाने अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी दिलेली ही दुसरी भेट आहे. यापूर्वी,पथकाने शनिवारी बॅनर्जी यांच्या निवासस्थानी भेट दिली होती आणि बनावट सही प्रकरणात त्यांना मुख्यालयात बोलावले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com