Scene from Dhanakwadi after vehicle vandalism where over 20 vehicles, including rickshaws and buses, were damaged. Police are investigating the Pune incident. Sarkarnama
पुणे

Pune Crime : पुण्यातील धनकवडीत दहशतीचा थरार: वीसहून अधिक वाहनांची तोडफोड, तर दोघांना मारहाण

Pune Vehicle Vandalism : पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री दहशतीचा प्रकार घडला. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथ नगर भागात 3 अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 23 Jul : पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी (ता. 22) मध्यरात्री दहशतीचा प्रकार घडला. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथ नगर भागात 3 अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना मंगळवारी रात्री 11.45 ते 1 च्या दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अज्ञात व्यक्तींनच्या एक ग्रुपने 15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बस आणि एका टेम्पोची काचफोड करत नुकसान केले. वाहनांची ही तोडफोड बघून काही नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा माग काढण्यासाठी डीबी पथक कार्यरत झाले आहे. या घटनेमुळे धनकवडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशा प्रकारे गाड्या जाळण्याचे, गाड्यांची तोडफोड करण्याची प्रकरण पुणे परिसरात घडत आहे. या माध्यमातून क्षेत्रीय टोळ्या आपली दहशत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस प्रशासन मात्र या सर्व घटनांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT