Pune District unauthorized schools: sarkarnama
पुणे

Pune Illegal Schools: शिक्षणाच्या माहेरघरात बोगस शाळा! पुणे जिल्ह्यात 45 अनधिकृत शाळा; 13 शाळांना मान्यताच नाही

Pune District unauthorized schools:ग्रामीण भागातील ११ शाळांना मान्यता असली तरी त्या मूळ मंजूर जागेऐवजी अन्य ठिकाणी अनधिकृतपणे स्थलांतरित करण्यात आल्याचेही तपासात आढळले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune district schools news: पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांची एकत्रित यादी जाहीर केली असून जिल्ह्यात एकूण ४५ शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामध्ये पुणे महापालिका हद्दीतील १२, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ९ आणि ग्रामीण भागातील २४ शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील १३ शाळांना शासनाची कोणतीही मान्यता नसल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शाळा शासन मान्यता नसतानाही प्रवेश प्रक्रिया आणि जाहिराती करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालावरून ही यादी प्रसिद्ध केली आहे.

ग्रामीण भागातील ११ शाळांना मान्यता असली तरी त्या मूळ मंजूर जागेऐवजी अन्य ठिकाणी अनधिकृतपणे स्थलांतरित करण्यात आल्याचेही तपासात आढळले आहे.

पुणे महापालिका क्षेत्रातील ३ शाळांना ‘इरादा पत्र’ मिळाले असले तरी त्यांना अंतिम शासन मान्यता मिळालेली नाही. तर पिंपरी-चिंचवडमधील एका शाळेविरोधात शासन निर्णयानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, संबंधित क्षेत्रात अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची आकडेवारी

एकूण अनधिकृत शाळा : ४५

  • पुणे महापालिका हद्दीत : १२

  • पिंपरी-चिंचवड हद्दीत : ९

  • ग्रामीण भागात : २४

  • शासन मान्यता नसलेल्या ग्रामीण शाळा : १३

  • अनधिकृत स्थलांतरित शाळा : ११

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT