शिक्रापूर: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आहे. त्यांनी डीजेला विरोध करत पुण्यात रान उठवले आहे. अशातच पुणे पोलिसांनी डीजेचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी DJचा आवाज वाढवला तर थेट गुन्हा दाखल करणार अशा इशारा DJचे मालक आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील संपूर्ण गणेशोत्सव काळात जिल्ह्यात वाजणा-या प्रत्येक डिजेचा आवाज मोजणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार थेट गुन्हे दाखल करणार असे पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक संदीपसिंग गिल यांनी शिक्रापूरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गणेशोत्सव काळातील सर्व लेझर-प्लाझमा यांची थेट जप्तीही करणार आहोत. या निर्णयात तडजोड नसून आवाज मोजणी यंत्रे सर्व पोलिस स्टेशनला पोहचलेली आहेत. आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोतच, मात्र जनतेने आता १३३ वर्षांनंतरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची नेमकी गरज कशी आहे, याबाबत जागृतीने उत्सवाच्या उद्देशांमध्ये बदल करुन घेण्याची गरज असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीपसिंग गिल यांनी शिक्रापूरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्ध राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी केला होता. आता १३३ वर्षांनी तत्कालीन गणेशोत्सवाचे उद्देश बदललेले आहेत हे आपण स्विकारतच नाही. यासाठी आता आपण प्रत्येकाने स्वत:त, समाजात आणि प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उद्देशात बदल करुन सध्या चाललेल्या अनेक घटनांकडे गांभिर्याने आणि संवेदनशीलतेने पाहून अंमली पदार्थ विरोधी भूमिका, सीसीटिव्ही जागृती, वृक्षसंवर्धन, जागृतीच्या रिल्सची प्रसारणे, लहान मुलांबाबत सुरक्षेची यंत्रणा अशा उद्देशाने कामे करणे गरजेचे असून सध्या सुरू असलेल्या डीजे आणि प्लाझमा साऊंडच्या बाबतीत खरोखरीच संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे.
डिजेच्या बाबतीत सर्वात जास्त त्रास होतोय तो अज्ञान-लहान बालकांना, ज्येष्ठांना, महिलांना आणि रुग्णांना. हा वर्ग असा आहे की, त्यांना बोलायला, तक्रार करायला आवाजच नाही. हा आवाज आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी होणे गरजेचे असून डिजेचे आवाज जिल्ह्यात झाला नाही पाहिजेत. याबाबतीत आपण अत्यंत संवेदनशील असून यावेळीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात जिल्ह्यात वाजणा-या प्रत्येक डिजेचा आवाज मोजून त्यावर कायदेशीर कारवाई आपण करणार असल्याचा जिल्हा पोलिसांचा निर्णय झालेला आहे. यावेळी शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड उपस्थित होते.
डिजेच्या बाबतीत तक्रार करावी लागते मगच कारवाई होते, हा ट्रेंड आपण बदलत असून आम्ही तर कारवाई करणारच आहोत, मात्र ज्यांना कुणाला त्रास होतोय त्यांनी थेट पोलिसांना कळविण्याचे आवाहन मी करीत आहे. केवळ पोलिसांवर न विसंबून राहता कुणीही सामान्यांनी तक्रार केली तर आम्ही कारवाई करणारच असे ठामपणे गिल यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.