Dr Apoorva Heere: शिक्षकाच्या मृत्यूनं हिरे-भुसे संघर्षाला नवा ट्विस्ट! मालेगावचं राजकारण तापलं; शिक्षण विभागावर गंभीर आरोप

Dr Apoorva Heere Vs Dada Bhuse: शिक्षक सोपान बोरसे यांच्या मृत्यूनंतर नऊ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने मालेगावातील हिरे-भुसे राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे
 Dr Apoorva Heere Vs Dada Bhuse
Dr Apoorva Heere Vs Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: मालेगावमध्ये शिक्षण विभागाच्या चौकशीदरम्यान शिक्षक सोपान बोरसे यांच्या मृत्यूनंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. डॉ. अपूर्व हिरे यांनी चौकशीच्या नावाखाली शिक्षकांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला असून, हिरे-भुसे संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

मालेगावच्या म्युनिसिपल हायस्कूलच्या मागे शिक्षण विभागाच्या तपासणीचा ससेमिरा सुरू होता. यानिमित्ताने शिक्षण विभाग विरुद्ध डॉ अपूर्व हिरे हा वाद ओघानेच चर्चेत आला. आता हे प्रकरण शिक्षण विभागावर चांगलेच शेकण्याची चिन्हे आहेत.

मालेगावच्या म्युनिसिपल हायस्कूलची तपासणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू होती. यामध्ये शिक्षण विभागाच्या पथकाने जाणीवपूर्वक शिक्षकांना त्रास देण्याचा आरोप होत आहे. यामुळे संस्थेच्या शिक्षकांमध्ये तणावाची स्थिती होती.

त्यातच दोन दिवसांपूर्वी शिक्षण विभागाचे पथक या शाळेत पुन्हा तपासणीला आले. या धक्क्याने शाळेतील सोपान बोरसे या शिक्षकाचा मृत्यू झाला. शिक्षकाच्या मृत्यूमुळे शाळेच्या आणि संस्थेच्या शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शिक्षण विभागाकडून जाणीवपूर्वक या शाळेला त्रास दिला जात होता. वारंवार तपासणी करून शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात होती. या धमकीने अनेक शिक्षक दबावाखाली आले होते. या दबावातूनच बोरसे या शिक्षकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.

या निमित्ताने संस्थेचे संचालक डॉ अपूर्व हिरे यांना त्यांचे विरोधक आणि मंत्री दादा भुसे यांच्या शिक्षण विभागावर आरोप करण्याची संधी चालून आली आहे. या संदर्भात डॉ हिरे यांनी शिक्षण विभागाला आव्हान दिले आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ हिरे यांनी मागील सहा महिन्यांपासून या शाळेमागे चौकशीचा जाच सुरू होता.

 Dr Apoorva Heere Vs Dada Bhuse
Narendra Mehta: भाजप आमदाराच्या शाळेचा अजब फतवा! डब्यात कांदा-लसूण, बटाटा-कंदमुळांनाही बंदी; पालक संतापले

जाणीवपूर्वक शिक्षकांना मानसिक त्रास देण्यात येत होता. यातूनच ही दुर्घटना घडली आहे. संस्थेत काही दोष असल्यास तो सिद्ध करावा. हवे तर माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा मात्र प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे कारस्थान करू नये, असे त्यांनी सांगितले.

मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या राजकारणात मंत्री दादा भुसे यांनी त्यांचे विरोधक डॉ हिरे यांच्या विरोधात गेले काही वर्ष मोहीम उघडली असल्याचा आरोप केला जातो. हिरे यांच्या विरोधात शिक्षण विभागाकडून विविध गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. त्यात हिरे यांना अटक देखील झाली होती. यामागे हिरे विरुद्ध भुसे हे राजकारण असल्याचे लपून राहिलेले नाही.

 Dr Apoorva Heere Vs Dada Bhuse
Gulabrao Patil on DJ: शिवसेनेच्या मंत्र्याला डीजेचा दणदणाट भोवला! सांगितली आपबिती पुतण्याच्या लग्नात नाचलो अन् ऐकण्याची क्षमता 40% घटली

शिक्षण विभागाच्या तपासणी सोपान बोरसे या शिक्षकाचा मृत्यू झाल्याने आता शिक्षण विभागातील नऊ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी फिर्याद देण्यात आल्याने शिक्षण विभागाचे अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा हिरे विरुद्ध भुसे या राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com