Pune Crime News  Sarkarnama
पुणे

Pune Crime News: खासगी क्लासमध्ये मुलांमध्ये गँगवार! शिक्षक शिकवत असताना चाकूने हल्ला; मित्रानेच केला मित्राचा घात

Rajgurunagar private class student murder news: खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजगुरुनगरमध्ये आज सकाळी ही घटना घडली. शिकवणी सुरु असताना एका विद्यार्थ्यांना दुसऱ्या एका मुलाचा चाकून गळा चिरला...

Mangesh Mahale

Pune News: पुण्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका खासजी क्लासमध्ये एका विद्यार्त्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला आहे. हल्ला करुन मुलगा दुचाकीवरुन फरार झाला आहे.

हल्ला झालेल्या मुलांची प्रकृती चिंताजनक होती. त्याला रुग्णालयात दाखल केले होते पण उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात भीतीचे वातावरण आहे.

खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजगुरुनगरमध्ये आज सकाळी खासगी क्लासमध्ये ही घटना घडली. शिकवणी सुरु असताना एका विद्यार्थ्यांना दुसऱ्या एका मुलाचा चाकून गळा चिरला होता.

क्लासला येण्यापूर्वीच त्याने चाकू आणला होता. क्लास सुरु झाल्यावर तो हल्ला करुन दुचाकीवरुन फरार झाला. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या क्लासमध्ये 13 ते 14 वर्ष वयोगटातील ही मुलं आहेत. 8 वी आणि 9 वी वर्गातील मुलांचा क्लास एकाचवेळी सुरु होता. त्यावेळी या हल्ला झाला.

हे दोघेही विद्यार्थी दहावीत शिकत होते. दोघेही मित्र होते. मित्राने मित्राच्या गळ्यावर वार केला. यात 16 वर्षीय मित्राचा मृत्यू झालाय. हल्ला करणाऱ्याचा मित्राचा शोध सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT