SRA रहिवाशांसाठी गुड न्यूज! अधिवेशात दोन महत्त्वाचे निर्णय; आर्थिक बोजा कमी होणार

SRA Pankaj Bhoyar Announcement Two Key Decisions:मेंटेनन्स साठी विकसकाकडून देण्यात येणारा चाळीस हजाराच्या कॉर्पसच्या व्याजामधून हा खर्च भागवता येत नाही, ही बाब भातखळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती. पंकज भोयर यांनी रहिवाशांना मोठा दिलासा देणारे निर्णय जाहीर केले.
SRA Pankaj Bhoyar Announcement Two Key Decisions
SRA Pankaj Bhoyar Announcement Two Key DecisionsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session : एसआरए इमारतीतील रहिवाशांसाठी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातून गुड न्यूज आहे. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी एसआरए रहिवाशांना मोठा दिलासा देणारे अत्यंत महत्त्वाचे दोन निर्णय जाहीर केले आहेत. हे निर्णय काय आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पंकज भोयर या निर्णयाबाबत सभागृहाला माहिती दिली. झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) योजनेंतर्गत टॉवरमध्ये स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना भेडसावणाऱ्या वाढीव देखभाल खर्चाच्या (Maintenance) समस्येवर भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत नागरिकांना मालकीची घरे मिळाली, परंतु पुनर्वसनाच्या उंच इमारतींमध्ये गेल्यानंतर वीज बिल आणि मासिक मेंटेनन्सचा खर्च सामान्य झोपडपट्टीवासीयांना परवडत नाही, त्यामुळे त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागतो.

मेंटेनन्स साठी विकसकाकडून देण्यात येणारा चाळीस हजाराच्या कॉर्पसच्या व्याजामधून हा खर्च भागवता येत नाही, ही बाब भातखळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती.भातखळकर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना पंकज भोयर यांनी रहिवाशांना मोठा दिलासा देणारे अत्यंत महत्त्वाचे दोन निर्णय जाहीर केले.

सोसायटीच्या देखभाल खर्चासाठी ठेवल्या जाणाऱ्या कॉर्पस फंडाची किमान रक्कम रु. ४० हजारांवरून वाढवून एक लाख ते दीड लाख केला जाईल. टॉवरच्या उंचीनुसार ही रक्कम वाढवण्यात येईल. ज्यामुळे सोसायटीच्या भविष्यातील खर्चासाठी मजबूत आर्थिक आधार मिळेल. रहिवाशांवरचा बोजा कमी होईल, असे भोयर यांनी सांगितले.

SRA Pankaj Bhoyar Announcement Two Key Decisions
Shiv Sena UBT: ठाकरे सेनेचे आस्ते कदम! मुंबईतील पदाधिकारी दोन दिवस तळ ठोकून संभाजीनगरमध्ये करणार उमेदवारांची चाचपणी

इमारतींवरील वीज बिलाचा बोजा कमी करण्यासाठी, लिफ्ट व सामाईक भागासाठी सौर ऊर्जेचा (Solar Power) वापर करण्याचा पर्याय सरकारने भातकळकर यांनी सुचवला होता. त्यावर सुद्धा सरकारने सकारात्मक उत्तर दिलेले आहे.

इमारतीची ओसी देण्यापूर्वी इमारतीवर सोलार पॅनल लावणे सक्तीचे केले जाईल, असे भोयर सांगितले. एस आर ए इमारतीतील रहिवाशांची या समस्या सरकारने गांभीर्याने घेतली आणि त्यावर तात्काळ उपाययोजनांची घोषणा केली. पुनर्वसन झालेल्या हजारो कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com