Jayashree Marne Contesting From Ajit Pawar NCP Sarkarnama
पुणे

Ajit Pawar: गुन्हेगारी संपवा म्हणणाऱ्या अजितदादांनी दिली गुंडाच्या पत्नीला उमेदवारी; जयश्री मारणे या प्रभागातून लढणार

Jayashree Marne Contesting From Ajit Pawar NCP: अजितदादांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बावधन परिसरात जयश्री मारणे यांचा वैयक्तिक जनसंपर्क आहे.

Mangesh Mahale

PMC Election: गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा देऊ नका, असा सातत्याने सांगणाऱ्या अजिक पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एका गुंडाच्या पत्नीला पुण्यात उमेदवारी दिली आहे. अजित पवारांनी गुंड गजा मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे (Jayashree Marne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या अर्ज भरण्यासाठी जयश्री मारणे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

गुंड गजा मारणे यांची पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री मारणे यांना प्रभाग क्रमांक १० मधून थेट एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजितदादांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बावधन परिसरात जयश्री मारणे यांचा वैयक्तिक जनसंपर्क आहे.

गजा मारणे यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून गज्याची ओळख म्हणून आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीवर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुद्दावरुन काँग्रेस आणि ठाकरे सेना अजित पवारांची कोंडी करणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गुन्हेगारी संपवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने पक्षातील काही इच्छुक नाराज असल्याची माहिती आहे. 8 दिवसांपूर्वी जयश्री मारणे अजित पवारांच्या भेटीसाठी बारामती हॅास्टेलला पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उमेदवारीसाठी चर्चा केली होती. जयश्री मारणे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा 'राजकीय'असल्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT