Nilesh Ghaiwal Pune Sarkarnama
पुणे

Nilesh Ghaiwal Pune : डझनाने गुन्हे, तरी गुंड निलेश घायवळ इंग्लंडला पळाला; पासपोर्टसाठी कोणाचा वरदहस्त?

Pune Police Begin Legal Action Against Gangster Nilesh Ghaiwal DCP Sambhaji Kadam : इंग्लंडमध्ये पसार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळविरुद्ध कारवाईसाठी पुणे पोलिस सर्व कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचे संकेत आहेत.

Pradeep Pendhare

Pune gangster Nilesh Ghaiwal : पुण्यात कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ इंग्लंडला पसार झाल्याची माहिती समोर आल्यानं पुणे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

इंग्लंडला जाण्यासाठी निलेश घायवळची तयारी, गंभीर गुन्हे दाखल असून, त्याने पासपोर्टची तयारी केली कशी? तिकिटाचे कन्फर्मेशन होताना, पोलिसांना दिलेला चकवा, पुणे पोलिस दलातील त्याचे 'खबरी', त्याला असलेला राजकीय वरदहस्त सर्वच गोष्टी चर्चेत आल्या आहेत. असे असले तरी, आता निलेश घायवळविरोधात कारवाईसाठी पुणे पोलिस दलाचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई होणार, असे संकेत त्यांनी दिले आहे.

पुण्यातील (Pune) कोथरूडच्या मुठेश्वर चौकाजवळ 18 सप्टेंबरला रात्री उशिरा निलेश घायवळ टोळीने रस्ता न दिल्यामुळे एका युवकावर गोळीबार केला, ज्यात प्रकाश धुमाळ नावाचा तरुण गंभीररित्या जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी मयूर कुंभारे, आनंद चांडलेकर, गणेश राऊत, मोंटी व्यास आणि दिनेश पाठक या पाच जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घायवळ टोळीच्या सदस्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.

निलेश घायवळ हा पुण्यातील मोठा गुंड आहे. हत्या करणे, दंगा करणे, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, हाणामारी यासारखे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. किंबहुना 'मकोका'सारखा गंभीर गुन्हाही त्याच्या नावावर आहेत. असे गंभीर गुन्हे नावावर असलेल्या संबंधित आरोपी तसेच नामचिन गुन्हेगाराचा पासपोर्ट पोलिस जप्त करतात. मात्र घायवळ प्रकरणात पोलिसांनी (Police) पासपोर्ट जप्त का केला नाही, अशी विचारणा पोलिसांकडे होत आहे.

पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी यावर म्हणाले, "याची चौकशी सुरू आहे. परंतु पूर्वीच्या एका गुन्ह्यांमध्ये संदीप घायवळ याला उच्च न्यायालयाने पासपोर्ट जमा करण्याचा आदेश दिला होता. त्याने उच्च न्यायालयाचे आदेशाची देखील उल्लंघन केले आहे. हे सर्व आम्ही रेकॉर्डवर घेतलं आहे आणि त्यानुसार कारवाई करत आहोत."

'कोथरूड घटनेनंतर निलेश घायवळ हा भारत सोडून पळालेला आहे. परंतु आपण पोलिस प्रोसिजरनुसार त्यावर कारवाई करत आहोत. तो बाहेर प्रदेशात गेलेला आहे. परंतु नेमका कुठे गेला आहे, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. परंतु त्याच्या लोकेशनवर त्याच्या हालचालीवर आपण लक्ष ठेवून आहोत. यात आपण नक्कीच कारवाई करू,' असे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी म्हटले आहे.

घायवळच्या मुलांचं परदेशात शिक्षण 

निलेश घायवळ हा प्रदेशात निघून गेलेला आहे, त्याची मुले देखील पदेशात शिक्षण घेत आहेत. हा इतर लोकांना वापरून घेतो, धाकधपट करतो. लोकांच्या जमिनी बळकावून, त्या जोरावर आपल्या मुलांना प्रदेशात चांगले शिक्षण देत आहे. दुसऱ्यांचे आयुष्य बरबाद करून तसेच आपल्या सहकाऱ्यांकडून गुन्हे घडवून, त्यांचा वापर करून स्वतःची लाईफ, फॅमिलीला श्रीमंती अन् आरामात जगवत असल्याची निलेश घायवळची पद्धत आहे, असे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी म्हटले.

गुन्ह्यांची दुसऱ्यांचा वापर

निलेश घायवळ हा त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून किंवा वापर करून खंडणी वसुली करतो. जमिनीचे व्यवहार बळजबरीने करून घेतो, गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीने धमकावून स्वतःसाठी आणि त्याच्या पुढच्या पिढीसाठी व्यवस्था करतो आहे, त्याची मुलं प्रदेशात शिकत आहेत, अशी आमच्याकडे माहिती आहे. स्वतः परदेशाचे दौरे करतो. स्वतःचा आयुष्य चांगलं कसं होईल हे ते फक्त पाहतो आहे, असे आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी म्हटले.

लूक आऊट नोटिस 

निलेश घायवळ विरुद्ध लूक आऊट नोटिस जारी केलेली आहे. याशिवाय इतर कायदेशीर प्रक्रियाही राबवत आहोत. निलेश घायवळ याला मराठवाड्यातील, धाराशिव, अहिल्यानगर मधील अनेक राजकीय व्यक्तींचं पाठबळ मिळत असल्याचे देखील समोर येत आहे. राजकीय लोकांचा वापर करून त्यांनी त्याची गुन्हेगारी वाढवली आहे, आता हीच गुन्हेगारी पुण्यामधील सर्वसामान्यांच्या मुळावर उठली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT