Pune Graduate Election | Counting Update | Result Sarkarnama
पुणे

Pune Graduate Result : पुणे पदवीधरचा निकाल नेमका कधी लागणार? प्रत्यक्ष मतमोजणी संदर्भातील मोठी अपडेट आली समोर

Pune Graduate Result Update : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. परंतू अद्याप निकालाचा कल समोर आलेला नाही. त्यामुळे मतमोजणीला इतका वेळ का लागत आहे आणि निकालाचे चित्र नेमके कधी स्पष्ट होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Jagdish Patil

Pune Graduate Election Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मात्र, मतमोजणी सुरू झाल्यानंतर केंद्रावरील आठ मतपेट्यांचे सील तुटलेले आढळल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे काही काळ मतमोजणी केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पुन्हा मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत सुरू करण्यात आली.

दरम्यान, सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होऊनही अद्याप निकालाचा कल समोर आलेला नाही. त्यामुळे मतमोजणीला इतका वेळ का लागत आहे आणि निकालाचे चित्र नेमके कधी स्पष्ट होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व मतपत्रिकांचे ५०-५० चे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मतपत्रिकांचे पात्र आणि अपात्र असे वर्गीकरण केले जाणार आहे.

या वर्गीकरणानंतर पात्र मतपत्रिकांच्या आधारे विजयासाठी आवश्यक असलेला कोटा निश्चित केला जाईल. कोटा निश्चित झाल्यानंतर मतपत्रिकांचे उमेदवारनिहाय वर्गीकरण करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कल समोर येण्यासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागू शकते. दुपारी ४ वाजल्यानंतरच मतमोजणीचा प्राथमिक कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी सायंकाळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या निकालाची उत्सुकता असलेल्या उमेदवारांसह कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुणे पदवीधरमध्ये कोणामध्ये लढत?

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT