Harshada Deshmukh Jadhav Sarkarnama
पुणे

MLC Election: भाजपचा सत्ता व संपत्तीचा माज सुशिक्षित मतदार उतरवणार, विजय आपलाच होणार : हर्षदा देशमुख-जाधव

Pune Graduate Constituency: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपवर टीका केली. बेरोजगारी, रखडलेली शिक्षक भरती आणि शैक्षणिक प्रश्नांवर मतदान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामा ब्यूरो

Pune Graduate Election News: पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची ठरत असून, महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला. भाजपचा सत्ता व संपत्तीचा माज सुशिक्षित मतदार उतरवणार असून पुणे पदवीधर मध्ये विजय आपलाच होणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

हर्षदा देशमुख-जाधव यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट केले की, भाजप सरकारची सत्ता आणि संपत्तीचा बडेजाव सुशिक्षित मतदार खपवून घेणार नाही. पदवीधर मतदार हा सुजाण, विचारी आणि उच्चविद्याविभूषित असतो; त्यामुळे तो दिखाऊ राजकारणाला भुलणार नाही, तर राज्यापुढील बेरोजगारी, रखडलेली शिक्षक भरती आणि शैक्षणिक प्रश्न यांवर मतदान करेल.

हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, मी कोणतीही पूर्वतयारी न करता किंवा ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे असे नाही, तर मागील दीड वर्षांहून अधिक काळ संपूर्ण पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात यासाठी पायाभरणी केली आहे. गावोगावी फिरून विद्यार्थी, तरुण आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. भाजपच्या उमेदवाराची निवड ही ऐनवेळी झालेली आहे. त्यामुळे सुशिक्षित मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहून सत्तेची मस्ती उतरवतील, असा दावा त्यांनी केला आहे.

​पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने एकजूट दाखवत प्रचारात आघाडी घेतली आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांनीही हर्षदा देशमुख-जाधव यांच्या पाठीशी उभे राहत तरुण पिढीचा आवाज विधान परिषदेत पोहोचवण्यासाठी प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

प्रचाराचे कळीचे मुद्दे

बेरोजगारी व शिक्षक भरती: हजारो शिक्षकांची पदे प्रलंबित असल्यामुळे आणि धोरणात्मक अनास्थेमुळे विद्यार्थी व तरुण वर्गात निर्माण झालेला असंतोष.

शहरी व ग्रामीण प्रश्न: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या संपूर्ण मतदारसंघातील उच्च शिक्षण, हक्क आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या समस्या.

सत्ताधारी पक्षाची अरेरावी: सत्तेचा गैरवापर आणि पैशाच्या बलदानावर निवडणूक जिंकण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध सुशिक्षित वर्गाचा रोष.

गोकुळची पुनरावृत्ती होणार?

सर्व ताकदीनिशी, तयारीनिशी अन मोठ्या फौजेच्या माध्यमातून मैदानात उतरलेल्या महायुतीला सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने पराभवाची धूळ चारली. कोल्हापूरच्या स्वाभिमानी मतदारांनी पैशाला न भुलता आपल्या प्रामाणिक नेत्याला अन त्यांच्या अस्तित्वाला साथ दिली. याचीच पुनरावृत्ती पुणे पदवीधर मतदारसंघात होणार आहे, असा दावा त्यांनी केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT