MLC Election 2026: पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, 1051 केंद्रांवर मतदान; 6900 कर्मचाऱ्यांची फौज तैनात

Pune division’s graduate and teacher MLC elections are scheduled: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यांत १,०५१ मतदान केंद्रे सज्ज होत आहेत. २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
graduate and teacher MLC elections
graduate and teacher MLC elections Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Graduate Constituency Election News : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये १ हजार ५१ मतदान केंद्रांवर शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मतदान होणार आहे. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघात ४७, तर शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार रिंगणात असून, तब्बल ४ लाख ५० हजार १९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सुमारे ६ हजार ९०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उमेदवारांची संख्या निश्चित झाल्याने राजकीय पातळीवर प्रचाराची धामधूम सुरू असतानाच, दुसरीकडे निवडणूक यंत्रणा मतदानाच्या नियोजनात व्यस्त झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.

पदवीधर मतदारसंघात ३.८८ लाख मतदार

पदवीधर मतदारसंघात ३ लाख ८८ हजार १९ मतदार असून, शिक्षक मतदारसंघात ६२ हजार मतदार आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी ७४१, तर शिक्षक मतदारसंघासाठी ३१० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघांत मिळून ४ लाख ५० हजार १९ मतदार मतदान करणार आहेत.

जिल्हानिहाय मतदारसंख्येचा विचार करता, पदवीधर मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १४ हजार ५६२ मतदार आहेत. तर शिक्षक मतदारसंघात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ८८२ मतदार आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांसाठी जिल्हानिहाय नियोजन आणि मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

graduate and teacher MLC elections
यूट्युबर ध्रुव राठींची महिन्याला कमाई किती? एकूण संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

६,९०० कर्मचाऱ्यांवर निवडणुकीची जबाबदारी

मतदान प्रक्रियेसाठी राखीव कर्मचाऱ्यांसह पदवीधर मतदारसंघासाठी ४ हजार ७१५, तर शिक्षक मतदारसंघासाठी २ हजार २२७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई असे पथक कार्यरत असेल. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांसह वैद्यकीय कर्मचारीही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

मतदानासाठी पदवीधर मतदारसंघात २ हजार ९५८, तर शिक्षक मतदारसंघात ७०३ मतपेट्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. मतदानानंतर मतपेट्या पोलिस बंदोबस्तात बालेवाडी येथील स्वीकृती केंद्रात जमा केल्या जाणार आहेत. यासाठी सुमारे ७५० वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.

आचारसंहितेवर भरारी पथकांची नजर

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. पाच जिल्ह्यांत मिळून १५ भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागालाही सतर्क ठेवण्यात आले आहे.

राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण, पेडन्यूज आणि निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनावर लक्ष ठेवले जात आहे. तक्रारींच्या निवारणासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना ०२०-२६३४०५३४ या क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे.

graduate and teacher MLC elections
CJP Protest : सुटका होताच 'सीजेपी' नेत्यांची मोठी मोठी घोषणा, आशूतोष रांकांनी स्पष्ट सांगितले, 'ही लढाई...'

२३ ऑक्टोबरला मतदान; २७ ऑक्टोबरला मतमोजणी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, वीज, रॅम्प, स्वच्छतागृहे, प्रथमोपचार आणि मतदार मदत केंद्रांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मतदारांनी मतदानाच्या वेळी वैध पसंतीक्रम नोंदवून आपले मत बाद होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com