Pune Helicopter Crash .jpg sarkarnama
पुणे

Pune Helicopter Crash : सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलं; तिघांचा मृत्यू

Pune Helicopter Crash Latest News : काही दिवसांपूर्वी पौड घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. त्यानंतर हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी दुर्घटना आहे.

Akshay Sabale

Helicopter crashes in Pune's Bavdhan : पुण्यात पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात बुधवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दौन वैमानिक आणि एक इंजिनिअर होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर धुक्यात अडकले होते. त्यानंतर ते खाली कोसळले. याबाबतचा फोन पिंपरी-चिंचवड पोलिसांना आला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. त्यामध्ये दोन वैमानिकांसह एका इंजिनिअरचा होरपळून मृत्यू झाला.

नेमकं घडलं काय?

ट्विन इंजिन ऑगस्ट बनावटीचं हे हेलिकॉप्टर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांना घेण्यासाठी पुण्याहून मुंबईला हे हेलिकॉप्टर जात होते. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरनं सकाळी उड्डाण घेतलं. काही अंतर कापल्यानंतर तीन मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळलं.

ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि 'एचईएमआरएल' ही केंद्र सरकारची संस्थेच्या दरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.

आंध्र प्रदेशला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात...

24 ऑगस्टला पुणे जिल्ह्यातील पौड भागात घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. मुंबईहून उड्डाण केलेले हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशला जात असताना दुर्घटनाग्रस्त झाले होते. हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह एकूण चार प्रवासी होते. त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT