Devendra Fadnavis : मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची नासधूस प्रकरण पोलिसाला भोवलं; केली मोठी कारवाई

Devendra Fadnavis Office vandalises : गुरूवारी ( 26 सप्टेंबर ) देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालायातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर मंत्रालयातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
devendra fadnavis
devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील एका महिलेनं नासधूस केली होती. याप्रकारानंतर मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच, एवढी कडक सुरक्षा असताना ही महिला मंत्रालयात पोहोचली कशी? असा सवालही उपस्थित होत आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.

मंत्रालयाच्या गेटवर महिलेची चौकशी केली नाही. अथवा तिला अडविण्यात आलं नाही, असं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय होतं?

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस ( Devendra fadnavis ) यांचं कार्यालय आहे. गुरूवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास एक महिला फडणवीस यांच्या कार्यालयात घुसली आणि आरडाओरडा करायला सुरूवात केली. महिलेने कार्यालयाबाहेरील झाडांच्या कुंड्या फेकून दिल्या. दालनाबाहेर असलेली फडणवीस यांच्या नावाची पाटीही काढून फेकून दिली होती.

devendra fadnavis
Thackeray Vs Fadnavis : उद्धव ठाकरे अन् फडणवीसांमध्ये खलबतं; दिल्लीतही बड्या नेत्यांमध्ये बैठक?

या घटनेनंतर महिला दादरमधील रहिवाशी असल्याचं समोर आलं होतं. मात्र, मंत्रालयासारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी महिला प्रवेशाशिवाय कशी आली? असा सवाल उपस्थित झाला होता. याप्रकरणी पोलिस चौकशी करण्यात आल्यानंतर हवालदार अनिल धनंजय आवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

devendra fadnavis
MNS News: देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला?

प्राथमिक चौकशीत सचिव प्रवेशद्वारावर महिलेला अडविण्यात आले नाही. अथवा तिची चौकशी करण्यात आली नसल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. बेशिस्त आणि बेजबाबदारीचा ठपका ठेवून आवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com