Ravindra Dhangekar sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar News : 'बाहेरून बंद आतून सुरू...', रवींद्र धंगेकर आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत केली 'ही' मागणी

Sudesh Mitkar

Pune News : कल्याणी नगर भागात या पब संस्कृतीतूनच अपघात घडला आणि दोन निष्पाप जीव या अपघातात गेले. या घटनेतील आरोपीला वाचवण्यासाठी पोलिस व आरोग्य विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी गुंतल्याचे दिसून आले आहे, असा हल्ला करत आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आयुक्तालया समोर त्यांनी आंदोलन केले. थेट 'एक्साइज'च्या कार्यालयात धडक मारली. आता धंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत पब संस्कृतीला आवर घालण्याचा आग्रह धरला.

पुण्याच्या बाणेर, बालेवाडी हायस्ट्रीट, भूगाव, भूकुम, वाकड या परिसरात पब, बार उशिरापर्यंत पर्यंत सुरू राहत आहेत. हे पब, बार बाहेरून बंद असले तरी आतून सुरू असतात. त्यामुळे या भागात अजूनही उशिरापर्यंत धिंगाणा सुरूच आहे. तो रोखला जावा, अशी मागणी काँग्रेसचे Congress आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

शहरात वाढत असलेल्या पब संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे पत्र दिले. यावेळी रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar म्हणाले, पब संस्कृतीतूनच अपघात घडला आणि दोन निष्पाप जीव या अपघातात गेले.त्याचवेळी पब संस्कृतीला आवर घालण्यासाठी, ही पब संस्कृती मोडून काढण्यासाठी आमची धडपड सुरू आहे.

त्यामुळेच सध्या शहरात वेगवेगळ्या भागात पब, बार, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई सुरू आहे. पण पोलिस, पालिका, उत्पादन शुल्क विभाग यांचे पुण्याच्या भूगावसह पश्चिम भागाकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 11 नंतर येथे मद्य विक्री केली होत नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मद्यविक्री राजरोसपणे सुरूच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे धिंगाणा वाडला आल्याने स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक, भूगाव,भुकुम हा निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. येथे नयनरम्य तलाव आहे. अनेक लोक पर्यटनासाठी येथे येतात त्यामुळे या परिसराचे सौंदर्य टिकून राहिले पाहिजे. याबाबत आपण योग्य ती पावले उचलावी, अशी मागणीही आमदार रवींद्र धंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT