hit and run case sarkarnama
पुणे

Pune Hit And Run Case : 'बिल्डर का बेटा हूँ 'भाई'...म्हणत अगरवाल कुटुंबाच्या अडचणी वाढवणारा सापडला

Police : Police : अल्पवयीन आरोपीने पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव वेगात आपल्या पोर्श कारने दोघांना उडवले, या घटनेत दोन इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला न्यायालयात हजर केले

Roshan More

Pune Hit And Run Case : पुणे हिट अॅण्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने जामीनानंतर घाणरेडी भाषा वापरत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्या व्हिडिओत मुलाने वापरलेल्या भाषेमुळे संताप व्यक्त करण्यात येत होता. हा व्हिडिओ खरा की आहे 'डीपफेक' याबाबत पोलिस चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. हा फेक व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हा फेक व्हिडिओ बनवणाऱ्याची ओळख देखील पटवली आहे.

आर्यन देव निखरा असे फेक व्हिडिओ बनवणाऱ्याचे नाव आहे. तो मुळचा मध्यप्रदेशातील असून त्याने ग्वाल्हेर येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तो मीम बनवतो. त्यानेच पुणे हिट अॅण्ड रन Pune Hit And Run Case प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे डीफफेक व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केले. हा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

अल्पवयीन आरोपीने पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव वेगात आपल्या पोर्श कारने दोघांना उडवले, या घटनेत दोन इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला न्यायालयात Court हजर केले असता अवघ्या काही तासातच त्याला जामीन मंजूर झाला. गाडी चालवण्याआधी आरोपीने दारु प्यायली होती तसेच तो पुण्यातील बिल्डर विशाल अगरवाल यांचा मुलगा असल्याचे देखील समोर आले होते. त्याला काही तासातच जामीन मिळाल्याने संताप व्यक्त केला जात होता.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुलाच्या आईचा व्हिडिओ

अल्पवयीन मुलाच्या आईन रॅप साँगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपल्या मुलाने हा व्हिडिओ बनवला नसल्याचे त्यांनी सांगितले. तो सुधारगृहात असून त्याने हा व्हिडिओ बनवला नाही, असे देखील त्या म्हणाल्या.

'त्या' व्हिडिओमध्ये काय?

“बारबार आ रहाँ हैं की, भाई पोर्शेने उडा दी, दो लोगों की जान ले ली. 18 साल का लडका नशे में गाडी चला रहा था. जस्टिस…जस्टिस… कोई इस बारे में बात नहीं कर रहाँ. सारे बात कर रहें है मेरी फिडबॅक की एक लाईन बोलके हमेशा चले जाते हैं. कोई बात ही नहीं कर रहा इस बारे में. भाई एक काम करो ना, माँ XX XX XXX XX किसी बिल्डर X XX? एक बिल्डर पकडो, और उसके पास अपने XXX भेज दो अशा अश्लील भाषेत संवाद साधताना दिसून येत आहे. तसेच घटनेचा पश्चाताप तर नाही उलट रॅप साँग गाताना तो तरुण दिसला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT