Pune Porsche Accident- sunil Tingre Sarkarnama
पुणे

Pune Hit And Run Case Update : आमदार सुनील टिंगरेंच्या शिफारशीने ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर झाला होता अधीक्षक !

Pune Porsche Accident : डॉ. तावरे यांना ससूनच्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करावे,असे शिफारसपत्र टिंगरे यांनी मंत्री मुश्रीफांना गेल्या वर्षी 26 डिसेंबर रोजी पाठविले होते. त्यामुळे आता या प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका होत आहे. Pune Hit and Run case Pune MLA Sunil Tingare Recommended Sasson Doctor Ajay Tawre to Hasan Mushriff

Sudesh Mitkar

Pune Porsche Crash News : कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये सुरुवातीला पोलिसांवर दबाव आणत आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर आता या  हिट अ‍ॅन्ड रन अपघात प्रकरणामध्ये अजून एक मोठा खुलासा समोर आला आहे. याचे कनेक्शन थेट आमदार सुनील टिंगरे यांच्यापर्यंत पोहचत असल्याचं समोर आलं आहे.

अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलले असल्याचा धक्कादायक बाब पुणे पोलिसांनी समोर आणली आहे. यामध्ये डॉ. अजय तावरे यांचा सहभाग असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या डॉ. तावरेंची अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली असल्याचे समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या अपघात प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आणि आरोपी असलेल्या डॉ.अजय तावरे यांची गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याची बाब ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावेळी विरोधी पक्षाकडून प्रकर्षाने समोर आणण्यात आली होती.

डॉ.तावरे यांना ससूनच्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करावे,असे शिफारसपत्र टिंगरे यांनी मंत्री मुश्रीफांना गेल्या वर्षी 26 डिसेंबर रोजी पाठविले होते. या पत्रात टिंगरे यांनी म्हंटले होते की, डॉ.तावरे हे माझ्या परिचयाचे असून ते प्राध्यापक आणि न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी कोरोना काळात आपले कर्तव्य उत्तमरित्या पार पाडले आहे. तरी त्यांची ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्याबाबत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करावी असे पत्रात नमूद करण्यात आले होते, त्यानंतर यावर मंत्री मुश्रीफ यांनी शेरा मारून ते पत्र ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना पाठविले होते. त्यानंतर तावरे यांची अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

बांधकाम व्यावसायिक असलेल्या विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय आरोपी मुलाला वाचविण्यासाठी डॉ. तावरे याने ब्लड सॅम्पल बदलले असल्याचे पोलिसांनी (Police) केलेल्या तपासात समोर आले आहे. तसेच या प्रकरणात तावरे याला एका लोकप्रतिनिधीचा फोन आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. त्यामुळे आता या अपघात प्रकरणांमध्ये सुनील टिंगरे यांची देखील चौकशी होणार का? होणार का याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. असे झाल्यास आमदार सुनील टिंगरे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT