Porsche Hit And Run Case : कल्याणीनगर अपघातप्रकरणी अटक डॉ. तावरेंनी वाढविले टेन्शन, म्हणाले मी सर्वांची नावे घेणार..!

Pune Accident Porsche : ससून रुग्णालयामधील डॉक्टरांच्या घशात नोटांची बंडले कोंबून या अल्पवयीन आरोपीचे थेट रक्ताचे नमुनेच बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल याने डॉ. अजय तावरे याच्याशी यासंदर्भात संपर्क साधलेला होता.
Pune Porsche Dr Ajay Taware
Pune Porsche Dr Ajay TawareSarkarnama

Pune Porsche Crash News : कल्याणीनगर अपघातामधील बांधकाम व्यावसायिकाच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ससूनमधील डॉ.अजय तावरे आणि डॉ.श्रीहरी हलणोर यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातील डॉ. अजय तावरे याने पोलिसांना कारवाई दरम्यान ‘मी शांत बसणार नाही. मी सगळ्यांचीच नावे घेणार.’ असा इशारा दिला आहे.

या  हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणातील आरोपी डॉ.तावरे कोणाकोणाची नावे घेणार याकडे लक्ष लागले आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल घटकांबळे नावाच्या मध्यस्थाला अटक केली आहे. त्यानेच या डॉक्टरांना पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचे नाव देखील त्याने घेतले असून त्याच्याविषयी तपास सुरू करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Porsche Dr Ajay Taware
Pune Hit And Run Case : ससून ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातील तिसरा मासा पोलिसांच्या गळाला!

कल्याणीनगर अपघातामधील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शीना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर, ससून रुग्णालयामधील डॉक्टरांच्या घशात नोटांची बंडले कोंबून या अल्पवयीन आरोपीचे थेट रक्ताचे नमुनेच बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

या आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल याने डॉ. अजय तावरे याच्याशी यासंदर्भात संपर्क साधलेला होता. त्यावेळी फोनवरुन एका लोकप्रतिनिधीने डॉ. तावरे यांना आरोपी मुलाला मदत करण्याबाबत सांगितल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हा लोकप्रतिनिधी कोण याकडे लक्ष लागले आहे. पोलिसांना (Police) याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली असली तरी या लोकप्रतिनिधीचे नाव सांगण्यास पोलीस आपला हात आखडता घेत आहेत.

कल्याणीनगर अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलणोर या दोघांनी मिळून अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते. त्याऐवजी भलत्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

याप्रकरणी दोघांवर भादवि 120 ब, 467, 201, 212, 213 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटात सहभागी असणे, बनावट कागदपत्र तयार करणे, पुरावा नष्ट करण्याचा आरोप या दोन्ही आरोपांवर ठेवण्यात आला आहे. त्यांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात या आरोपींनी कोर्टात (Court) देखील हजर केले जाणार आहे.

Pune Porsche Dr Ajay Taware
Excise Deparment News : सुषमा अंधारेंच्या वसुली यादीने 'एक्साइज' घायाळ, अधिक्षकांचे प्रत्युत्तर 500 गुन्हे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com