Pune Hit And Run Case : पुण्यातील बहुचर्चित पोर्शेच्या अपघात प्रकरणात सोमवारी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
ससून हॉस्पिटलच्या Sasoon Hospital फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे Ajay Taware याचे अल्पवयीन आरोपीचे सॅम्पल संकलना दरम्यान सुमारे दोन तासांत 14 वेळा अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलणे झाले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या डॉक्टरांना पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयात ही माहिती दिली आहे. Pune Hit And Run Case Update
आरोपीने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी लाच घेतल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना घेतल्या नंतर तो डस्टबिनमध्ये टाकण्यात आला होता. त्याच्या जागी, दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.
या प्रकरणांमध्ये ससून रुग्णालयात काम करणारे डॉ. तावरे Dr Ajay Taware तसेच अपघातग्रस्त विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर आणि अतुल घाटकांबळे यांच्या घरांची झडती घेतली असता त्यांच्याकडून डॉ. हलनोर यांच्याकडून अडीच लाख रुपये आणि घाटकांबळे यांच्याकडून 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी Police डॉ. तावरे यांच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याला किती पैसे मिळाले किंवा किती देण्याचे आश्वासन दिले होते. पैसे देण्याचे आश्वासन कोणी दिले होते. याचा तपास केला जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान 19 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास ससून हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यावेळीचे कॉल डिटेल पाहिले असता त्या दोन तास मध्ये डॉ. तावरे आणि अल्पवयीन आरोपीच्या वडिलांमध्ये 14 वेळा फोनवर बोलणे झाले. हे कॉल्स व्हॉट्सॲप, फेसटाइम आणि सेल्युलर कनेक्शनवरही करण्यात आले होते. पोलिस डॉक्टर आणि अल्पवयीन आरोपीच्या वडिलांमध्ये कोणी मध्यस्थी केली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.