Pune Hit And Run Case Update : डॉ. तावरे, हाळनोरच्या डोक्यावर निलंबनाची टांगती तलवार; पोलिसांचा प्रस्ताव तयार

Sassoon Hospital Doctor : अपघातानंतर आठ तासांनंतर आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. यावर पोलिसांवर संशय आल्याने आरोपीच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी ससूनला पाठवले.
Shrihari Holnor, Ajay Taware
Shrihari Holnor, Ajay TawareSarkarnama

Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर येथील अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमून बदलून रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक केली आहे. त्यांच्यावर निलंबन होण्यासाठी आवश्यक असलेली पोलिस कारवाई झालेली आहे. या कारवाईचा अहवाल पोलिसांमार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही डॉक्टरांचे निलंबन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Pune Hit And Run Case Update

गेल्या आठवड्यात पुण्यात हिट अॅण्ड रन प्रकरणाची Pune hit and run case देशभर चर्चा सुरू असून राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अपघात झाल्यानंतर यातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल यांच्यासह स्थानिक आमदारानेही प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांवर राजकीय मोठा दबाव असल्याचीही चर्चा होती. त्यातून पोलिसांनी आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट दिल्याचे बोलेले जाते.

अपघातानंतर पोलिसांनी कर्तव्यात कसूर केला. प्रकरण गंभीर असूनही वरीष्ठांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच आठ तासांनंतर आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. यावर पोलिसांवर संशय आल्याने आरोपीच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी ससूनला पाठवले. मात्र ते रक्ताचे नमूने बदलून अहवाल बदलण्यासाठी वडील विशाल अगरवाल Vishal Agarwal यांनी डॉ. होळनोर याला तीन लाखांची लाच दिली. तसेच सुटीवर असतानाही डॉ. तावरेने होळनोरला अहवालात फेरफार करण्यास सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shrihari Holnor, Ajay Taware
Rahul Gandhi Vs Narendra Modi : होय.. नरेंद्र मोदींना देवानं पाठवलंय! पण कशासाठी...; राहुल गांधींची बोचरी टीका

ही बाब समोर येताच या दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली.आता चौकशीनंतर डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांचे निलंबन करण्यासाठीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला पोलिसांमार्फत बुधवारी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकरांनी Ravindra Dhangekar वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे आता या अहवालावर संबंधित विभागाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Shrihari Holnor, Ajay Taware
BMC News : 'बीएमसी'त मोठा घोटाळा? मुख्यमंत्री शिंदेंच्या 'ड्रीम प्रोजेक्ट' वादात; कंत्राटदाराने थेट पुरावेच दिले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com