Union Minister of State Murlidhar Mohol interacting with journalists at Pune Shramik Patrakar Sangh while addressing action against illegal flex banners in the city. Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol : पुण्यातील 'ते' भाजप नेते नगरसेवक पदापासून दूर राहणार ; मंत्री मुरलीधर मोहोळांचा इशारा

Pune Illegal Flex Action : पुण्यात अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या नगरसेवकांवर भाजप कडक कारवाई करणार असून, पक्ष आदेश डावलणाऱ्यांना पद न देण्याचा इशारा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुणे शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून शहर घाण करू नयेत असे आदेश भाजपतर्फे नगरसेवकांना देण्यात आले आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यावर जे नगरसेवक अनधिकृत फ्लेक्स लावत आहेत, त्यांना पद न देण्याबाबत विचार करणार का? असे विचारले असता, ‘‘पक्षाचा आदेश डावलून फ्लेक्स लावणाऱ्यांचा पक्ष गांभीर्याने विचार करेल, असा इशारा मोहोळ यांनी दिला. तसेच पुणेकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत. शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स काढून संबंधितांवर कारवाईचे आदेश आयुक्तांना दिले आहेत, असे मोहोळ यांनी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात मुरलीधर मोहोळ बोलत होते. संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले यावेळी उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, ‘‘पुणे शहर फ्लेक्समुक्त करू असे आश्वासन आम्ही नागरिकांना दिले आहे. त्याची पूर्ती आमच्याकडून केली जाईल. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स लागले आहेत. त्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत.

महापालिका निवडणुकीत विरोधकांनी आमच्यावर पातळी सोडून वैयक्तिक टीका केली. पण मतदारांना आमच्या वैयक्तीक भांडणापेक्षा तुम्ही आम्हाला काय देणार? हे महत्त्वाचे होते. त्यामुळे नकारात्मक राजकारण न करता आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला.

शहराचा विकास, नवीन प्रकल्प, सुविधा यावर पुणेकरांनी आम्हाला मतदान केले. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही अजित पवार यांच्यासह अन्य कोणावरही टीका टिप्पणी न करता केवळ विकासावर बोलणार आहोत. जर आमच्याकडे कागदपत्र उपलब्ध झाले तर आम्ही त्यावर नक्की बोलू असेही मोहोळ यांनी सांगितले.

ज्यांना संधी नाही त्यांचा विचार

पुणे महापालिकेच्या (PMC) निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचा विचार होऊ शकतो. पण याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच होईल. शिवसेनेसोबत आमची युती नव्हती त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा विषयच नाही, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. तसेच समाविष्ट गावातील विकासासाठी तेथील नगरसेवकांनाच पद दिले पाहिजे असे नाही. शहराच्या संपूर्ण विकासासाच अजेंडा आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत, त्यामुळे समाविष्ट गावांचाही विकास होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT