Pune Crime: ...अन् गणपती विसर्जनाच्या दिवशीच अख्खं पुणं हादरलं! घायवळ टोळीच्या 6455 पानांच्या दोषारोपत्रात धक्कादायक बाब समोर

Nilesh Ghaywal Gang Firing Case : गणेश विसर्जनाच्या दिवशी कट रचून कोथरूडमध्ये गोळीबार केल्याचा धक्कादायक खुलासा 6455 पानांच्या दोषारोपपत्रातून झाला असून, नीलेश घायवळ टोळीविरोधात मोठी कारवाई झाली आहे.
Police investigation visuals related to the Kothrud firing case as a massive 6,455-page chargesheet reveals the Ganesh Visarjan day conspiracy by the Nilesh Ghaywal gang.
Police investigation visuals related to the Kothrud firing case as a massive 6,455-page chargesheet reveals the Ganesh Visarjan day conspiracy by the Nilesh Ghaywal gang.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : कोथरूड भागात गोळीबार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या टोळीतील 9 गुंडा विरोधात तब्बल साडेसहा हजार पानांचे दोषारोपपत्र विशेष मकोका न्यायालयात पोलिसांनी सादर केले आहे. या गुन्ह्यात 17 जणांवर कारवाई केलेली असून, 9 जणांना अटक केली आहे. तर, घायवळसह आठ जणांना फरार घोषित करण्यात आले आहेत.

कोथरूड परिसरात दहशत असणाऱ्या नीलेश घायवळ गॅंग ने गेल्या वर्षी 2 तरुणांवर हल्ला केला होता. या गुन्ह्यात कोथरूड पोलिस ठाण्यात हत्या करण्याचा कट्टा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात गुंड नीलेश घायवळ, मयुर कुंबरे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी गणेशोत्सव विसर्जन दिवशी गुन्ह्याचा कट रचल्याचे समोर आली आहे.

त्यानंतर पोलिसांनी निलेश घायवळ टोळीतील 9 गुन्हेगारांवर 6455 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असून या दोषारोप पत्रामध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी रचलेल्या कटाबाबत मोठा खुलासा झाला आहे.

शास्त्रीनगर भागात काही दिवसात जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवितो आणि केस लागली तर बाहेर काढतो, असे सांगून निलेश घायवळ ने गणेशोत्सव विसर्जन रोजी कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

17 सप्टेंबर रोजी घायवळ टोळीतील गुंडांनी हा गोळीबार केला होता. याबाबत घायवळ टोळीतील 9 गुन्हेगारावर गुन्हे शाखेने 6 हजार 455 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.त्यामध्ये हा कट गणेश विसर्जनाच्या दिवशी रचल्याचे म्हटले आहे.

Police investigation visuals related to the Kothrud firing case as a massive 6,455-page chargesheet reveals the Ganesh Visarjan day conspiracy by the Nilesh Ghaywal gang.
Nana Bhangire आणि शिवसेनेच्या उमेदवार Sarika Pawar सारिका पवार यांच्यावर हल्ला ।Pune News।

हा गुन्हा घडल्यानंतर काही दिवसात गँगस्टर निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असून त्याला पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली आहे. त्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस ही जारी करण्यात आली आहे.

Police investigation visuals related to the Kothrud firing case as a massive 6,455-page chargesheet reveals the Ganesh Visarjan day conspiracy by the Nilesh Ghaywal gang.
Pune ZP Election: पुणे,पिंपरी चिंचवड महापालिकेनंतर आता भाजपचा जिल्हा परिषदेतही डाव; अजितदादांना धक्क्यावर धक्का

अटक केलेल्या 9 आरोपीविरुद्ध 12 जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये मयुर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे, मयंक मॉन्टी विजय व्यास, गणेश सतिश राऊत, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चांदलेकर, मुसाब ईलाही शेख, जयेश कृष्णा वाघ, अक्षय दिलीप गोगावळे, अजय महादेव सरोदे अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com