Congress News Sarkarnama
पुणे

Pune Loksabha : पुणे लोकसभा काँग्रेसच लढवणार; 'या' नेत्याने दावा ठोकत दिली मोठी अपडेट

Chaitanya Machale

Pune News: महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षच पुणे लोकसभेची जागा लढणार,असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शनिवारी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून ते बूथ पातळीपर्यंत सर्व स्तरावर काँग्रेस पक्षाने तयारी पूर्ण केलेली असून पक्षाचा उमेदवार नक्की निवडून येईल, असा दावा देखील शिंदे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाची पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी बैठक काँग्रेस भवन येथे होत आहे. येत्या 23 जानेवारीला ही बैठक पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. याबाबतची माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ॲड.अभय छाजेड, संगीता तिवारी, अजित दरेकर, यावेळी उपस्थित होते.

मंगळवारी 23 जानेवारीला कॉंग्रेस भवन येथे होणाऱ्या या बैठकीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकीला दीड हजारांपेक्षा अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे देखील उपस्थित असणार आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी होणार आहेत. बूथ कमिट्या, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने तयारी, संघटनात्मक बांधणी अशा विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'रस्त्यावर भक्ती दाखविण्यापेक्षा भाजपने...'

अयोध्या येथे 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण शहरात जागोजागी चौका चौकात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स होर्डिंग तसेच जाहिरात फलक लावलेले आहेत.

याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांना विचारले असता ते म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप रामभक्ती समोर येत आहे. आम्ही रामाचे किती मोठे भक्त आहोत हे दाखवण्यासाठी रस्त्यावर फ्लेक्स मी जाहिरात फलक लावले जात आहेत. आमचे त्यांना आव्हान आहे त्यांनी रस्त्यावर भक्ती दाखविण्यापेक्षा मंदिरात जाऊन भक्ती दाखवावी. आगामी निवडणुकीवर भाजपकडून सध्या सुरू असलेल्या राममंदिर इव्हेंटचा कोणताही परिणाम मतदारांवर होणार नाही, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT