Nana Patole : पुणे काँग्रेसमधील गटबाजी संपवण्यासाठी नाना पटोले सरसावले; घेतला मोठा निर्णय...

Pune Congress : पुण्यात भाजपची सरशी, तर काँग्रेसची पीछेहाट
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : महायुतीने घटकपक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र अनेक जिल्ह्यांत महायुतीत आलबेल असल्याचे दिसून आले नाही. तीच स्थिती महाविकास आघाडीतही दिसून येत आहे. त्यातच पुण्यातील काँग्रेसअंतर्गतच असलेल्या अनेक गटांत रुसवे-फुगवे वाढून मतभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील या गटातील वाद मिटवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी आता शहरातील वरिष्ठ नेत्यांना कामाला लावले असूनही त्यांनीही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Nana Patole
Sudhakar Shrangare : खासदार सुधाकर शृंगारेंची उमेदवारी धोक्यात; लातूरमध्ये भाजपचं गणित काय ?

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना अर्ज करण्याची विनंती करण्यात आली होती. यावेळी पुण्यातून तब्बल वीस जणांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली. अशावेळी एखाद्या इच्छुकाला उमेदवारी जाहीर केली, तर इतर सर्वच इच्छुकांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. तसेच यापूर्वीच्या निवडणुकांमध्येदेखील काँग्रेसची गटबाजी प्रकर्षाने समोर आली होती. त्याचे परिणामही काँग्रेसला भोगावे लागले होते. आता लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गटबाजी काँग्रेसला परवडणारी नाही. हा धोका ओळखूनच शहर काँग्रेसमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचे प्रयत्न नाना पटोले (Nana Patole) यांनी सुरू केले आहेत.

Nana Patole
Rohit Pawar Vs Ram Shinde : पेपर लोकसभेचा; पण रोहित पवार अन् राम शिंदेंची तयारी विधानसभेची

मागील दोन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून काँग्रेसला मोठा पराभवाचा धक्का पचवावा लागला आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकीकडे भाजपने पुण्याला आपला गड बनवला असताना काँग्रेसची मात्र शहरात पीछेहाट सुरू आहे. तसेच आगामी लोकसभेसाठी भाजपकडून अनेक दिग्गज पुणे (Pune) लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

अशा स्थितीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसअंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्यावर सोपवली आहे. त्यानंतर उल्हास पवारांनी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी 24 जानेवारीला स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या स्नेहभोजनासाठी उल्हास पवारांनी (Ulhas Pawar) पुण्यातील 50 काँग्रेसनेत्यांची नावे निश्चित केलेली आहेत. त्यांना या स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. या स्नेहभोजनानिमित्ताने नेत्यांना एकत्र बोलावून संवाद घडवून आणण्याचे पवार आणि पटोलेंचे नियोजन आहे. हा कार्यक्रम डीपी रोडवरील घरकुल लॉन्स येथे होणार आहे. त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, पटोले यांनी जरी गटबाजी रोखण्यासाठी पावले उचलली असली तर या कार्यक्रमाला किती नेते उपस्थित राहणार? तसेच त्या नेत्यांमध्ये खरेच मनोमिलन होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Nana Patole
Jitendra Awhad : राम मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांना घरचा आहेर; रामाच्या झेंड्यांनी कळवा भगवामय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com